या कारणामुळे धोनीचे झाले भारतीय संघात पुनरागमन

या कारणामुळे धोनीचे झाले भारतीय संघात पुनरागमन

याआधी धोनीला दोन टी-२० मध्ये वगळ्यात आलं होतं, तेव्हा धोनी यापुढे टी-२० सामने खेळणार नाही असे म्हटले जात होते.

  • Share this:

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. भारतीय संघ यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड यष्टीरक्षक म्हणून करण्यात आली आहे. याआधी वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टा-२० मालिकेतून वगळण्यात आले होते. मात्र आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आणि त्यानंतर न्युझीलँडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.


याआधी धोनीला दोन टी-२० मध्ये वगळ्यात आलं होतं, तेव्हा धोनी यापुढे टी-२० सामने खेळणार नाही असे म्हटले जात होते. मात्र धोनीला पुन्हा एकदा टी-२० सामन्यासाठी निवडण्यात आले आहे. यानंतर धोनीला पुन्हा संघात निवडण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


बीसीसीआयने ऋषभ पंतला संधी देत त्याच्याकडे यष्टीरक्षकासह एक फलंदाज म्हणूनही पाहत होते. या कारणामुळे धोनीला विश्रांती देण्यात आली. आता सिलेक्टर वर्ल्ड कपसाठीची टीम बांधणी करत आहेत आणि धोनी वर्ल्ड कपमध्ये खेळणार हे निश्चित आहे. यामुळेच धोनीचे संघात पुनरागमन झाले.


नुकतेच चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद म्हणाले की, २०१९ वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियात कोणतेही बदल होणार नाहीत. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांतील पहिला सामना १२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 01:50 PM IST

ताज्या बातम्या