मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IND vs AUS: भाजप खासदाराच्या टीकेवर विहारीचा स्ट्रेट टाईव्ह, सेहवागचा सिक्सर!

IND vs AUS: भाजप खासदाराच्या टीकेवर विहारीचा स्ट्रेट टाईव्ह, सेहवागचा सिक्सर!

भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyao) यांना हनुमा विहारीचा (Hanuma Vihari) खेळ आवडला नव्हता. त्यांनी त्या मॅचनंतर विहारीवर जोरदार टीका केली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 14 जानेवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सिडनी टेस्ट ड्रॉ झाली. टीम इंडियाचा बॅट्समन हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दुखापतीची पर्वा न करता त्या मॅचमध्ये झुंजार खेळ केला. विहारीनं 161 बॉलमध्ये नाबाद 23 रन काढले. विहारी आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांच्या संयमी खेळामुळेच भारताचा पराभव टळला. या खेळीबद्दल विहारी-अश्विन जोडीची बहुतेकांनी प्रशंसा केली आहे. भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyao) यांना मात्र विहारीचा खेळ आवडला नव्हता. त्यांनी त्या मॅचनंतर विहारीवर जोरदार टीका केली होती. सुप्रियो यांनी विहारीला क्रिकेटचा मारेकरी असं म्हंटलं होतं. विहारीची मार्मिक प्रतिक्रिया हनुमा विहारीनं सुप्रियो यांच्या टीकेवर एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रियो यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विहारीचं चुकीचं नाव लिहलं होतं. त्यांनी विहारीचा उल्लेख हनुमा बिहारी असा केला होता. विहारीनं फक्त योग्य नाव लिहून त्यांची चूक सुधारली आहे. विहारीच्या या ट्विट्सवर क्रिकेट फॅन्सच्या जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्यानं विहारीच्या या टिकेनंतर ‘एक विहारी सब पर भारी’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. विहारीच्या स्ट्रेट ड्राईव्ह इतकाच सेहवागचा सिक्सर देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या