Home /News /news /

IND vs AUS कनकशन पर्यायावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया....

IND vs AUS कनकशन पर्यायावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया....

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील (IND v AUS) पहिल्या T20 नंतर कनकशन सबस्टिट्यूटचा वाद सुरु झाला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    कॅनबेरा, 5 डिसेंबर :  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वन-डे मालिका ( One Day series ) कोणत्याही वादाशिवाय शांततेत पार पडली. त्यानंतर कॅनबेरामध्ये (Canberra) मध्ये झालेल्या पहिल्या T20 नंतर वादाला सुरुवात झाली आहे. काय झाला वाद? कॅनबेरा T20 मध्ये बॅटिंग करताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी झाला. त्यामुळे भारताने फिल्डिंग करताना जखमी जडेजाच्या जागी कनकशन सबस्टिट्युट (Concussion substitute) म्हणून युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) ला मैदानात उतरवले. जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून चहल उतरलेला पाहताच ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीम लँगर चांगलाच संतापला होता. संतापलेल्या लँगरने त्याचा पहिल्या टेस्टमधील सहकारी आणि त्या मॅचमधील सामनाधिकारी डेव्हिड बूनशी चांगलाच वाद घातला. चहलने मारली बाजी कनकशन सबस्टिट्युट म्हणून उतरलेल्या युजवेंद्र चहलने कॅनबेरा वन-डेमध्ये चांगली बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाच्या रागावर मीठ चोळले. चहलने ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या. या शानदार बॉलिंगमुळे चहलला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विराटची पहिली प्रतिक्रिया कनकशन पर्यायावर सर्वत्र चर्चा सुरु असतानाच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “कनकशन पर्याय ही एक विचित्र गोष्ट आहे. ती आमच्यासाठी आज उपयुक्त ठरली. मात्र कदाचित पुढच्यावेळी तसे होणार नाही. चहलला खेळवण्याची कोणतीही योजना नव्हती. जडेजाच्या डोक्याला बॉल लागल्यानेच त्याला खेळाववं लागलं’’, असं विराटने स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा राग कायम ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा टीम इंडियावरील राग पहिली मॅच संपल्यानंतरही कायम आहे. “कनकशनचा निर्णय घेण्यात आला, याबाबत आम्हाला काहीही अडचण नाही, पण यातला पर्यायी खेळाडूही त्याच्यासारखाच असायला हवा. जडेजा ऑलराऊंडर आहे, त्याने बॅटिंग केली होती आणि चहल एक बॉलर आहे,” अशी नाराजी ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मोईसेस हेनरिक्सने व्यक्त केली. रवींद्र जडेजा आऊट टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित T20 मालिका खेळू शकणार नाही. त्याच्या जागेवर शार्दूल ठाकूरचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या