मी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री

तो शुन्यावर बाद झाला, त्याने शतक झळकावलं, त्याने वर्ल्ड कप जिंकला किंवा त्याला दौऱ्यातून बाहेर केलं तरी तो कधीच बदलला नाही.

  • Share this:

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीचं कौतुक करताना थकत नाहीयेत.

धोनीचं कौतुक करताना शास्त्री म्हणाले की, ‘मी सचिन तेंडुलकरला अनेकदा चिडताना पाहिलं आहे. पण महेंद्रसिंग धोनी कधीच चिडत नाही. असा खेळाडू ४० वर्षांतून एकदा येतो आणि त्याची जागा घेणं इतर कोणाला शक्य नाही.’

३७ वर्षांच्या धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९६ चेंडूत ५१ धावा केल्या. तर नंतरच्या दोन एकदिवसीय सामन्यात ५५ आणि ८७ धावा केल्या.

शास्त्री यांनी डेली टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘तो एक महान खेळाडू आहे. भारतातल्या महान क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. मी अजूनपर्यंत कोणत्याच व्यक्तीला एवढं शांत पाहीलं नाही मी अनेकदा सचिनला चिडलेलं पाहीलं आहे पण धोनी कधीच चिडत नाही.’

रवी शास्त्री यांच्यानुसार, ‘धोनीची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, असे खेळाडू ३०- ४० वर्षांत एकदाच येतात. मी प्रत्येक भारतीयांना हेच सांगू इच्छितो की, जोपर्यंत तो खेळत आहे त्याच्या खेळाचा आनंद घ्या. जेव्हा तो संन्यास घेईल तेव्हा अशी पोकळी निर्माण होईल जी भरणं फार कठीण असेल.’

रिषभ पंत अपेक्षांवर खरा उतरेल अशी आशा अनेकांना आहे. मात्र काहीही झालं तरी धोनीची गोष्टच काही वेगळी आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉनने रवी शास्त्रींना प्रश्न विचारला की, ‘पुढच्या २० वर्षांत रिषभ पंत धोनी होऊ शकेल का?’

यावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले की, ‘मी अशी आशा करतो की तो होईल. त्याच्याकडे ते सर्व गुण आहेत. धोनी त्याचा हिरो आहे. तो रोज धोनीला फोन करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानही त्याने धोनीला फोन केला होता.’

धोनीने २०११ नंतर कोणत्याच वृत्तपत्राला किंवा वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली नाही. याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, ‘तो शुन्यावर बाद झाला, त्याने शतक झळकावलं, त्याने वर्ल्ड कप जिंकला किंवा त्याला दौऱ्यातून बाहेर केलं तरी तो कधीच बदलला नाही. तो फार संयमी आहे. त्याच्या स्वभावात कधीच बदल होत नाही. २०११ नंतर त्याने कधीच मुलाखत दिली नाही याचच मला कौतुक वाटतं.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या