Elec-widget

सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL

सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL

तिच्या सहृदयी स्वभावामुळे आज ती अनेकांची आयडॉल झाली आहे

  • Share this:

वेस्टइंडीज, १३ नोव्हेंबर २०१८- भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या तिच्या दमदार प्रदर्शनासोबतच चांगल्या वागणुकीमुळेही चर्चेत आहे. वेस्टइंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला टी२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्युझीलँडविरुद्ध ५१ चेंडूत शतकी खेळी खेळणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघावर ७ गडी राखत विजय मिळवला.


भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरचं नवं रूप जगाने पाहिलं. त्याचे झाले असे की, राष्ट्रगीतावेळी एक मुलगी बेशुद्ध झाली. हरमनप्रीतने त्या मुलीला लगेच उचलून घेतलं. तिच्या याच सहृदयी स्वभावामुळे आज ती अनेकांची आयडॉल झाली आहे.
रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. आयशा जाफर शुन्यावर बाद झाली. त्यानंतर कर्णधार जावेरिया खानने टीमची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिही १७ धावा करून माघारी परतली.


मधल्या फळीतील निदा दार आणि  बिस्माह मारूफ यांनी धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत टीमचा धावफलक उंचावला. निदा दारने ५२ तर बिस्माह मारूफ ५३ धावा केल्यात. या दोघींना सोडून इतर कोणत्याही खेळाडूला मोठा धावफलक उभारता आला नाही. निर्धारित २० षटकांत ७ बाद १३३ धावा पाकिस्तानच्या संघाने केल्या.


१३४ धावांचे आव्हान भारताने १९ व्या षटकात पार केलं. मिताली राजने ४७ चेंडूत ७ चौकार लगावत ५६ धावा केल्यात. तर स्मृती मंधानाने मितालीला चांगली साथ देत २६ धावा केल्या. दोघींच्या भक्कम भागीदारीमुळे भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. जेमिमाह रोड्रिग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com