News18 Lokmat

न्युझीलँड दौऱ्यातूनही राहुल- पांड्याची हकालपट्टी

बीसीसीआयच्या ४१ नियमांनुसार दोघांना कोणत्याही सामन्यात तसंच कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 02:43 PM IST

न्युझीलँड दौऱ्यातूनही राहुल- पांड्याची हकालपट्टी

सिडनी, १२ जानेवारी २०१९- टीव्ही शो कॉफी विथ करणमध्ये वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयने हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला शिक्षा सुनावली आहे. दोघांना ऑस्ट्रेलिया मालिकेतून निलंबीत केलं असून दोघांची भारतात रवानगी केली आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारत न्युझीलँडच्या दौऱ्यावरही जाणार आहे. या दौऱ्यातूनही त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. भारतीय खेळाडू पांड्याने महिलांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांचा सर्वात जास्त विरोध केला जात आहे. आता मॅनेजमेंटने दोघांना पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

भारतात आल्यानंतर दोघांकडे त्यांच्या कृतीचं स्पष्टीकरण देण्यासाठी सात दिवसांचा अवधी असेल. यात त्यांच्यावर कारवाई का करू नये याचं उत्तर त्यांना  बीसीसीआयला द्यायचं आहे. बीसीसीआयच्या ४१ नियमांनुसार दोघांना कोणत्याही सामन्यात तसंच कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूंशी निगडीत अनेक वाद झाले आहेत. मात्र हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं हे प्रकरण गेल्या ८२ वर्षांत फक्त दुसरं आहे, जेव्हा भारतीय खेळाडूंना दौऱ्याच्यामध्येच स्वदेशात पाठवलं आहे. १९३६ मध्ये लाला अमरनाथ यांना तत्कालीन कर्णधार विज्जी यांनी एका प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान अपमानजनक वागणुकीमुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यातून निलंबीत करत भारतात पाठवण्यात आलं होतं.

परदेशी दौऱ्यात आतापर्यंत अनेकदा शिस्तीचा विषय उभा राहीला आहे. मात्र भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा बीसीसीआयने कारवाई केली आहे. तसेच दोषी खेळाडूंना स्वदेशात जायला सांगितले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने जुलै २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अमरनाथ हे राजकारणाचे बळी ठरले होते. पांड्या आणि राहुलचं प्रकरण हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यांना महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केल्याची किंमत चुकवावी लागली.


Loading...

VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...