रोहित शर्मामुळे पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करणार हरभजन सिंग

रोहित शर्मामुळे पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करणार हरभजन सिंग

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे रोहितला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, ०३ डिसेंबर २०१८- ऑफ स्पिनर हरभजन सिंगने नेहमीच भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. हरभजनने भारतासाठी २०१६ मध्ये शेवटचा सामना युएईविरुद्ध खेळला होता. संघाबाहेर राहूनही तो टीम इंडियाचं कौतुक करताना थकत नाही. दरम्यान, त्याचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हरभजनच्या नावाने असलेल्सया या ट्विटमध्ये तो ऑस्ट्रेलियाच्या संघाला सपोर्ट करणार असल्याचे म्हटलं आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘जर रोहित शर्माची कसोटी सामन्यात निवड केली नाही तर मी ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाठिंबा देणार.’ हरभजनने मात्र व्हायरल होत असलेले हे ट्विट त्याचं नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. त्याने हाच स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की, ‘माहीत नाही हे लोक कोण आहेत जे माझ्या नावाचा उपयोग करून असे निरर्थक ट्विट करतात. हे सगळं बंद करा आणि भारताला पाठिंबा द्या.’

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला वगळण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. ६ डिसेंबरपासून एडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रोहितचा संघात समावेश होणं आवश्यक आहे. सध्या १९ वर्षाचा पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. तसंच केएल राहुलही चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे रोहितची संघाला गरज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे रोहितला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

VIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार

First published: December 3, 2018, 5:20 PM IST

ताज्या बातम्या