देशासाठी लढलेला माजी सैनिक अडचणीत, गंभीरने उठवला आवाज

देशासाठी लढलेला माजी सैनिक अडचणीत, गंभीरने उठवला आवाज

गंभीरच्या ट्विटनंतर संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विटर हॅण्डलवरून रिट्विट करुन उत्तर दिलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 3 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. तो नेहमी अनेक समस्यांवर भाष्य करतो. आताही त्याने ट्विटरवर माजी सैनिकाचा फोटो पोस्ट केला आहे. त्या माजी सैनिकाला उपचारासाठी मदतीची गरज असून तांत्रिक कारणाने त्याला मदत मिळण्यात अडचण येत असल्याचं त्याने ट्विट केलं होतं.

1965 आणि 1971 च्या लढाईत भाग घेतलेल्या या माजी सैनिकाचा अपघात झाला. त्यानंतर उपचारासाठी पैसे नसल्याने त्याच्यासमोर समस्या निर्माण झाली होती. गंभीरने त्याच्या ट्विटरवर त्या माजी सैनिकाने मदत मागणारा फलक हातात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने भारतीय सैन्यदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना टॅग केलं आहे.

गंभीरच्या ट्विटनंतर संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून रिट्विट करण्यात आलं असून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असं म्हटलं आहे.

याआधीही गंभीरने सोशल मीडियावरून अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

First published: February 3, 2019, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading