गौतम गंभीरने तृतीयपंथीयांना मानले बहिण, साजरं केलं रक्षाबंधन

2007च्या विश्वचषक ट्वेंटी -20 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारा खेळाडू गौतम गंभीर भले आता संघाबाहेर असला तरीही तो भारतीय चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2018 12:35 PM IST

गौतम गंभीरने तृतीयपंथीयांना मानले बहिण, साजरं केलं रक्षाबंधन

26 ऑगस्ट : 2007च्या विश्वचषक ट्वेंटी -20 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारा खेळाडू गौतम गंभीर भले आता संघाबाहेर असला तरीही तो भारतीय चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय. गौतम गंभीर नेहमीच शहीद सैनिक आणि सैनिकांना मदत करण्याताना आपल्याला दिसतो. तसंच आजही रक्षाबंधनच्या पवित्र सणाला  त्यांनी लोकांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.

गौतम गंभीरने दोन तृतीयपंथ्यांना आपली बहिण मानत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली आहे. त्याच्या या अनोख्या रक्षाबंधनाचा फोटो त्याने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. गौतम गंभीरने अबीना अहर आणि सिमरन शेख या दोन तृतीयपंथींना बहीण मानून एक सकारात्मक आदर्श सगळ्यांसमोर घालून दिला आहे. इतरांप्रती गौतम गंभीरच्या भावना, ही चळवळ सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना खूप आवडते.

Loading...

खरंतर गौतम गंभीरला एक बहीण आहे. एकता असं तिचं नाव आहे. एकता गंभीरपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. गौतम गंभीर आपल्या बहिणाला सगळ्यात जवळची मैत्रिण मानतो. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी गौतमने 2009मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट सामना खेळण्यास मनाई केली होती. गौतम गंभीरच्या हटके स्वभावामुळे त्याचा एक वेगळाच फॅनक्लब तयार झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2018 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...