Home /News /news /

तसं झालं तर भारतीय क्रिकेट... रवी शास्त्रींचा गांगुलीला थेट इशारा

तसं झालं तर भारतीय क्रिकेट... रवी शास्त्रींचा गांगुलीला थेट इशारा

देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यंदा होणार की नाही हे अजूनही अनिश्चित आहे. या स्पर्धेबाबत टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी बीसीसीआयला गंभीर इशारा दिला आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यंदा होणार की नाही हे अजूनही अनिश्चित आहे . ही स्पर्धा 13 जानेवारी  पासून होणार होती, पण ओमीक्रॉनच्या धोक्यामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या स्पर्धेबाबत बीसीसीआयला गंभीर इशारा दिला आहे. 'रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतीय क्रिकेटच्या पाठीचा कणा आहे. या स्पर्धेकडं दुर्लक्ष केल्यास आपले क्रिकेट कणाहीन होईल, ' असे ट्विट शास्त्री यांनी केले आहे. रवी शास्त्री हे सात वर्ष टीम इंडियाचे कोच होते. त्यांच्या काळात भारतीय टीमनं टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. त्यामुळेच शास्त्रींनी दिलेला हा इशारा गंभीर मानला जात आहे.कोरोना व्हायरसमुळे 2020-21 पासून रणजी स्पर्धा झालेली नाही. यावर्षी 2 टप्प्यात स्पर्धा? रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 38 टीम भाग घेतात. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारी रोजी ही स्पर्धा सुरू होणार होती. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आता रणजी ट्रॉफी स्पर्धा 2 टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी दिली आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दिलासा, BCCI करणार 'त्या' निर्णयावर शिक्कामोर्तब 'आम्ही रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. आमची नियामक टीम या विषयावर काम करत आहे. पुढच्या महिन्यात या स्पर्धेचा पहिला टप्पा खेळवण्याचा विचार सुरू आहे. दुसरा टप्पा आयपीएल नंतर पूर्ण होऊ शकतो. सध्याच्या योजनेनुसार रणजी ट्रॉफीचे साखळी सामने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतील. तर पुढचा टप्पा जून आणि जुलै महिन्यात आयोजित केला जाईल.' असे त्यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Ravi shastri

    पुढील बातम्या