World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

भारतीय संघात दोनच पदवीधर, इतरांचा अभ्यास जेमतेम

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 05:22 PM IST

World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

भारताचा कर्णधार फलंदाजीत तिन्ही प्रकारात अव्वल आहे. त्याने एका पाठोपाठ अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. क्रिकेटच्या सरावाला त्याने वयाच्या अकराव्या वर्षी सुरूवात केली. त्याने 12 वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीतील चौथा वर्ल्ड कप खेळणार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने 2011 ला वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणाऱ्या या खेळाडूला त्याचं 12 वी नंतरचं शिक्षण मात्र पूर्ण करता आलं नाही.

वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधारपदाची धुरा असलेला रोहित शर्मासुद्धा 12 वी पर्यंतच शिकला आहे. 12 वी नंतर त्याने शिक्षणाऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.

Loading...

भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.

भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.

सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या केएल राहुलने खेळासोबतच अभ्यासाकडेही लक्ष दिले. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचे नाव घेतले होते. भारतीय संघातील दोन पदवीधरांपैकी तो एक आहे. त्याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगले असले तरी अभ्यास मात्र खराब आहे. नववीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. त्यानंतर हार्दिक पांड्या कधीच शाळेकडं फिरकला नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. त्यामुळं साहजिकच अभ्यास करणं म्हणजे एक दिव्य वाटायचं. त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेशच घेतला नाही.

आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या जसप्रीत बुमराहला क्रिकेटनं एवढं झपाटलेलं की त्याला शाळेला जाण्याची इच्छाच नव्हती. आई शिक्षिका असल्याने अभ्यासासाठी तगादा लावला जायचा. मात्र जेव्हा त्याच्यातील क्रिकेटमधलं कौशल्य दिसलं तेव्हा हायस्कूलचं शिक्षण झाल्यावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

भारताचा वेगवान आणि रिवर्स स्विंगमध्ये तरबेज असणारा गोलंदाज मोहम्मद शमी उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशच्या अंडर 19 संघात निवड न झाल्याने तो कोलकाताला गेला. त्याच्या शिक्षणाबद्दल स्पष्ट माहिती नाही मात्र, तो दहावीपर्यंत शिकल्याचे समजते.

अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड झालेला विजय शंकर तामिळनाडुचा आहे. केएल राहुलनंतर विजय भारतीय संघातील दुसरा पदवीधर खेळाडू आहे.

केदार जाधव अशा कुटुंबातील आहे जिथं सर्वांनी उच्चशिक्षण घेतलं. त्याच्या तिनही बहिणींनी पीएचडी, इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे. तर केदार जाधवने नववीतच शिक्षणाला रामराम ठोकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...