धोनीला दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्याने घेतला क्रिकेटमधून संन्यास

महेंद्रसिंग धोनी हा एक यशस्वी कर्णधार होता याबद्दल कोणाचंच दुमत नसेल

  • Share this:

महेंद्रसिंग धोनी हा एक यशस्वी कर्णधार होता याबद्दल कोणाचंच दुमत नसेल. धोनीने आतापर्यंत भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. तसेच अनेक मालिकांमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्येही चेन्नई सुपरकिंग्ज संघाला धोनीने त्याच्या हुशारीने जिंकवून दिले.

आता त्याच्या याच टीममधला एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. त्याच्या या बातमीमुळे माहीला मोठा धक्का बसला असेल यात काही शंका नाही.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रावोने गुरूवारी तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. ब्रावोने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ३७० सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने ६३१० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण ३३७ विकेट्सचीही नोंद आहे. ब्रावोने एकूण १४९ झेलही पकडले आहेत.

ड्वेन ब्रावोने करिअरमध्ये दोनदा टी२- वर्ल्ड कप जिंकला आहे. २०१२ आणि २०१६ मध्ये ब्रावो वेस्ट इंडिजच्या चॅम्पियन टीमचा हिस्सा होता.

आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्जच्या यशातही ब्रावोचा मोठा वाटा आहे. त्याने तीनपैकी दोनवेळा चेन्नई सुपरकिंग्जला आयपीएलचा किताब जिंकण्यात मदत केली आहे. एकदा तर ब्रावो आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

ब्रावो २०१० मध्ये शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना आणि २०१६ मध्ये शेवटचा टी२० सामना खेळला. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये तो फारसा गाजला नसला तरी आयपीएल, बिग बॅश आणि बांग्लादेश प्रिमिअर लीग अशा टुर्नामेंटमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.

ब्रावो फक्त क्रिकेटपटू नसून तो एक गायक आणि अभिनेताही आहे. त्याने उला या तमिळ सिनेमातही काम केलं आहे. तसेच त्याने अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

फार कमी लोकांना माहीत आहे की, ड्वेन ब्रावो आणि ब्रायन लारा हे नातेवाईक आहेत. ब्रावो कोणत्याही सामन्यात मैदानात जाण्यापूर्वी चॉकलेट खातो. तसेच त्याला बर्फाच्या पाण्यात आंघोळ करायला आवडतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2018 05:58 PM IST

ताज्या बातम्या