मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IPL स्पर्धेनंतरही ऋतुराज गायकवाडचा ड्रीम फॉर्म कायम, 9 बॉलमध्ये ठोकले 38 रन

IPL स्पर्धेनंतरही ऋतुराज गायकवाडचा ड्रीम फॉर्म कायम, 9 बॉलमध्ये ठोकले 38 रन

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वाधिक रन काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) ड्रीम फॉर्म कायम आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वाधिक रन काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) ड्रीम फॉर्म कायम आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वाधिक रन काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) ड्रीम फॉर्म कायम आहे.

मुंबई, 4 नोव्हेंबर : नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वाधिक रन काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) ड्रीम फॉर्म कायम आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali trophy) ऋतुराज महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहे. तामिळनाडू विरुद्ध (Maharashtra vs Tamil Nadu) मॅचमध्ये ऋतुराजनं दमदार अर्धशतक झळकावलं आहे.

तामिळनाडूनं दिलेल्या 168 रनचा पाठलाग करताना ऋतुराजनं 28 बॉलमध्ये दमदार अर्धशतक झळकावलं. या खेळीत त्यानं 8 फोर आणि 1 सिक्स लगावला. याचाच अर्थ त्यानं फक्त 9 बॉलमध्ये 38 रन काढले. ऋतुराज अर्धशतकानंतर लगेच 51 रन काढून आऊट झाला. त्यापूर्वी तामिळनाडूनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 167 रन काढले.

तामिळनाडूकडून या मॅचमध्ये पदार्पण करणाऱ्या साई सुंदरमनं 19 बॉलमध्ये 35 रनची आक्रमक खेळी केली. तर तामिळनाडूचा कॅप्टन विजय शंकर (Vijay Shankar) यानं 21 बॉलमध्ये नाबाद 42 रन काढले.

आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2020 च्या अखेरच्या तीन मॅचमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली होती. यानंतर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने 88*, 38, 40, 45 आणि 101* रनची खेळ केली. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्ये ऋतुराजने 70 रन केले आणि चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलं. त्यानं सपूर्ण स्पर्धेत 43.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले.

टीम इंडियाचे नवे कोच राहुल द्रविड यांचा कॅप्टन पदासाठी रोहित शर्माला पाठिंबा

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. याचसोबत एमएस धोनीच्या सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

First published:

Tags: Cricket news, Csk, Tamilnadu, महाराष्ट्र