दक्षिण आफ्रिकेनं संघातून वगळलं, स्टेननं विराटसह भारतीयांची मागितली माफी!

दक्षिण आफ्रिकेनं संघातून वगळलं, स्टेननं विराटसह भारतीयांची मागितली माफी!

दक्षिण आफ्रिकेच्या संघातून डेल स्टेनला वगळल्यानंतर त्यानं निवड समितीला टार्गेट केलं आहे. त्यानंतर विराटसह भारतीयांची माफी मागितली आहे.

  • Share this:

जोहान्सबर्ग, 14 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं संघ जाहीर केला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज डेल स्टेनला वगळण्यात आलं आहे. त्यानंतर स्टेननं निवड समितीवर मजेशीर टीका केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, मी खेळणार आहे असं सांगितलं होतं पण निवड समितीनं त्याचा नंबर कुठेतरी हरवला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर ख्रिस मोरिसला संघात न घेतल्याबद्दल एका युजरनं ट्विट केलं होतं. युजरनं म्हटलं होतं की, ख्रिस मोरिसला संघात घेतलं नाही कारण त्यानं आपण खेळू शकणार नसल्याचं सांगितलं होतं. मी मात्र उपलब्ध होतो. तरीही प्रशिक्षकांच्या फेरबदलात माझा नंबर हरवला असं खोचक उत्तर स्टेननं दिलं होतं.

डेल स्टेनच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी रिप्लाय दिले होते. त्यात एका ट्विटला रिप्लाय देताना डेल स्टेननं भारताचा कर्णधार विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे. एका युजरनं डेल स्टेनची संघात निवड न झाल्याबद्दलचं कारण सांगतानं म्हटलं की, नव्या प्रशिक्षकांनी मोठ्या संघाविरुद्ध तुझी गरज पडेल म्हणून सध्या विश्रांती दिली असेल. (नव्या निवड समितीत कोण आहे?)असा प्रश्न युजरनं विचारला होता. त्यावर डेल स्टेननं उत्तर दिलं आहे. डेल स्टेन म्हणतो की, विराट आणि सर्व भारतीयांची माफी मागतो ज्यांना वाटतं की भारत मोठा संघ वाटत नाही.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डेल स्टेननं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्यानं आपण मर्यादित क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं म्हटलं होतं. स्टेनने 93 कसोटीत 439 विकेट घेतल्या आहेत. डेल स्टेन कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

कसोटी संघ - फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनीस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डिन एल्गर, झुबयर हम्झा, केशव महाराज, एडन मार्कराम, सेनुरन मुथूसॅमी, लुंगी एनगिडी, अॅनरिच नोर्टजे, वेर्नोन फिलेंडर, डेन पिएड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

टी 20 संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, टेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 14, 2019, 1:42 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading