क्रिकेटच्या भांडणाचा बदला: मित्राचे आतडं आणि डोळे काढले; मृतदेहावर चोळलं मीठ

क्रिकेटच्या भांडणाचा बदला: मित्राचे आतडं आणि डोळे काढले; मृतदेहावर चोळलं मीठ

एकदा सुरजीतला घराबाहेर भेटण्यासाठी बोलावलं आणि त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : जुन्या वादातून मित्राची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये समोरा आला. क्रिकेट खेळताना मित्रांचा वाद झाला आणि त्याचा राग मनात ठेवत मित्रांनी त्याची हत्या करत बदला घेतला. चाकूने वार करत मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आतड्या बाहेर काढण्यात आल्या. त्याचे डोळे बाहेर काढण्यात आले. सगळ्यात धक्कादायक म्हणजे एवढं करूनही त्यांचा राग शातं झाला नाही म्हणून त्याच्या मृतदेहावर मीठ चोळलं.

दिल्लीमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरजीत कश्यप (22)असं हत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून अद्याप 2 जण फरार आहेत. त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

एका महिन्याआधी क्रिकेट खेळताना सुरजीत कश्यपसोबत मित्रांचा वाद झाला. याचा राग मित्र्यांच्या मनात होता. त्यांना सुरजीतचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी एकदा सुरजीतला घराबाहेर भेटण्यासाठी बोलावलं आणि त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.

हेही वाचा : आईच्या गर्भाशयातच भांडल्या जुळ्या बहिणी, VIDEO झाला व्हायरल

आरोपींच्या मनात इतका राग होता की चाकूने भोकसून त्यांनी सुरजीतच्या आतड्या बाहेर काढल्या, त्याचा गळा कापला, त्याचे डोळे बाहेर काढलं. या सगळ्यात सुरजीतचा जागीच मृत्यू झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. एवढ्या कृरतेने मारल्यानंतरही आरोपींचा राग काही शांत झाला नाही. त्यामुळे त्यांनी चक्क सुरजीतच्या मृतदेहावर मीठ चोळलं.

यासंपूर्ण प्रकारामुळे दिल्लीत सध्या भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे तर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. सोमबीर सिंघल, विक्की झा, सतबीर आणि विक्की भट्ट अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलीस आता त्यांचा कसून तपास करत आहेत.


VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या