खळबळजनक! व्हाईड बॉल टाकला म्हणून फलंदाजाने डोक्यात बॅट घालून केली गोलंदाजाची हत्या

खळबळजनक! व्हाईड बॉल टाकला म्हणून फलंदाजाने डोक्यात बॅट घालून केली गोलंदाजाची हत्या

एका व्हाईड बॉलने घेतला गोलंदाजाचा जीव, फलंदाजानं डोक्यात बॅट घालून केली हत्या.

  • Share this:

जौनपूर, 19 जानेवारी : क्रिकेट हा अनिश्चित खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट सामन्यात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. असाच एक प्रकार एका स्थानिक सामन्यात घडला. एका गोलंदाजानं व्हाईट बॉल टाकला म्हणून फलंदाजानं डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सुजानगंज येथील बलहामाऊ गावात घडली. फलंदाजावर सध्या भा.द.वि. 304 अ (निष्काळजीपणाने हत्या करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या गुन्हागाराला अटक करण्यात आलेली नाही.

वाचा-लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं केलं अपहरण, शेतात नेऊन गँगरेप केल्याचा आरोप

वाचा-पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या सपना शूटरला अखेर ठोकल्या बेड्या

बलहामाऊ येथे गावातील तरुण मिळून क्रिकेट खेळत असताना दोन गटांमध्ये वाद झाल. दरम्यान यावेळी गोलंदाज रजनीश पांडे (24) यानं गोलंदाजी केली. यावर आरोपी फलंदाज अंबुज मिश्रानं हा व्हाईड बॉल असल्याचे सांगितले तर रजनीशनं चेंडू वैध असल्याचे सांगत या दोघांमध्ये वाद झाला. या एका गोष्टीवरून दोघांमधील वाद टोकाला गेला आणि फलंदाज अंबुजने रजनीशच्या डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केली. यात रजनीश पांडे जागीच बेशुद्ध झाला.

वाचा-VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या!

वाचा-मंगळवेढ्यात तरुणाने घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या

ही बातमी इतर खेळाडूंनी रजनीशच्या घरच्यांना कळवताच त्यांनी त्याला जवळच्या प्रतापगड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी प्रयागराजला जाण्यास सांगितले. दरम्यान प्रयागराजला जात असताना वाटेतच रजनीशचा मृत्यू झाला. या बातमीनंतर संपूर्ण बलहामाऊ परिसरात खळबळ उडाली असून. पोलीस सध्या आरोपी अंबुज मिश्रा याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Jan 19, 2020 06:42 PM IST

ताज्या बातम्या