मुंबई, 30 ऑगस्ट: भारत महिला टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India womens tour of Australia Schedule) पुन्हा एकदा बदल झाला आहे. न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया (Victoria) राज्यात कोरोना पेशंट्सची संख्या वाढल्यानं लॉकडाऊन कठोर करण्यात आला आहे. यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. आता या सीरिजमधील सर्व सामने क्वीन्सलँडमध्ये (Queensland) होतील. यापूर्वी या सीरिजमधील पहिला सामना 19 डिसेंबरला होणार होता. तो आता 21 डिसेंबरला होईल. त्याचबरोबर सर्व सामन्यांच्या जागेतही बदल करण्यात आला आहे.
भारतीय महिला टीमच्या दौऱ्याची सुरुवात वन-डे सीरिजनं होणार होती. पहिला सामना सिडनी दुसरा मेलबर्न आणि तिसरा पर्थमध्ये होणार होता. पण आता तीन्ही सामने क्वीन्सलँड राज्यातील मकायमध्ये होतील. येथील ग्रेट बॅरियर रिफ एरिना (Great Barrier Reef Arena) स्टेडियमध्ये हे सामने होतील. दोन्ही टीममधील पिंक बॉल टेस्ट 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ही टेस्ट आता पर्थच्या जागी गोल्ड कोस्टवरील मेट्रीकॉन स्टेडियमवर (Metricon Stadium) खेळली जाईल. याच मैदानावर 7, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.
टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईन
टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये दोन आठवडे क्वारंटाईन राहणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया टीममधील जे खेळाडू न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया राज्यातील आहेत, ते देखील ब्रिस्बेनमध्ये 14 दिवस क्वांराटाईन राहणार आहेत.
IND vs ENG: भारताला पराभूत केल्यानंतरही इंग्लंडमध्ये होणार बदल, पंतचा सहकारी टीममध्ये परतला
आमचं देशातील परिस्थितीवर लक्ष आहे. कोरोनामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी दिली आहे. त्याचबरोबर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टीममधील खेळाडूंना क्वारंटाईन राहण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी क्वीन्सलँड सरकारचे आभारही मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.