VIDEO : शेन वॉर्नला विसराल अशी अफलातून गोलंदाजी, त्यानं लॉर्ड्सवर घेतली पहिली विकेट

VIDEO : शेन वॉर्नला विसराल अशी अफलातून गोलंदाजी, त्यानं लॉर्ड्सवर घेतली पहिली विकेट

लॉर्ड्स स्टेडियमबाहेर उभा करण्यात आलेल्या पुतळ्याला गोलंदाजी करत एका लहान मुलानं त्याला झेलबाद केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

लॉर्ड्स, 19 ऑगस्ट : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या स्टेडियमबाहेर एका लहान मुलानं केलेल्या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोणीही लहान मुलगा जर गोलंदाज त्यातही फिरकीपटू होण्याचं स्वप्न बघत असेल तर तो शेन वॉर्नचा आदर्श डोळ्यासमोर नक्की ठेवेल यात शंका नाही. असाच आदर्श घेतलेल्या मुलाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. लॉर्ड्सच्या स्टेडियम बाहेर लावण्यात आलेल्या एका फलंदाजाच्या पुतळ्याला त्या मुलानं गोलंदाजी केली. फक्त गोलंदाजीच केली नाही तर विकेटसुद्धा घेतली.

अवघ्या सहा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये लॉर्ड्सच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फलंदाजाच्या पुतळ्याला लहान मुलानं बाद केल्याचं दिसत आहे. या मुलानं शेन वॉर्नच्या शैलीत गोलंदाजी केली. त्यानंतर पुतळ्याच्या बॅटला चेंडू लागल्यानंतर तिथून जात असलेल्या एका व्यक्तीने झेलला.

लॉर्ड़्सबाहेर असलेला तो पुतळा नेमका कोणत्या फलंदाजाचा आहे हे ओळखणं कठीण आहे. मात्र ट्विटरवर लहानग्याच्या शेन वॉर्न स्टाइल गोलंदाजीची चर्चा जोरदार सुरू आहे. 16 ऑगस्टला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्याला आतापर्यंत 3 लाख 96 हजार लोकांनी पाहिला आहे.

अनेकांनी इंग्लंडला नव्या फिरकीपटूची गरज पडेल त्याच्यावर लक्ष ठेवा असं म्हटलं आहे. तर काहींनी ही त्याची शेवटची विकेट ठरायला नको त्याला योग्य प्रशिक्षण मिळू दे, त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असं म्हटलं आहे.

एका युजरनं त्याचा आणि शेन वॉर्नचा गोलंदाजीचा व्हिडिओ एकत्र करून शेअर केला आहे. त्या दोघांमध्ये कोण बेस्ट असा प्रश्न विचारला आहे.

नाना पाटेकर यांनी घेतली अमित शहांची भेट, EXCLUCIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading