मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये कोरोनाचा कहर, BBL मधील मॅच टॉसपूर्वी स्थगित

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये कोरोनाचा कहर, BBL मधील मॅच टॉसपूर्वी स्थगित

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) कोरोनाचं संकट वाढलं आहे.  त्यानंतर आता बिग बॅश लीगला (Big Bash League) देखील कोरोनाचा फटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) कोरोनाचं संकट वाढलं आहे. त्यानंतर आता बिग बॅश लीगला (Big Bash League) देखील कोरोनाचा फटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) कोरोनाचं संकट वाढलं आहे. त्यानंतर आता बिग बॅश लीगला (Big Bash League) देखील कोरोनाचा फटका बसला आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) कोरोनाचं संकट वाढलं आहे. इंग्लंडच्या कॅम्पमधील 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता बिग बॅश लीगला (Big Bash League) देखील कोरोनाचा फटका बसला आहे. या स्पर्धेत गुरुवारी होणारी मॅच टॉस होण्याच्या काही तास आधी कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावी लागली.

बिग बॅश लीगमध्ये गुरूवारी पर्थ स्कॉचर्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स (Perth Scorchers and Melbourne) यांच्यात मॅच होणार होती. पण स्टार्सच्या सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरोनाची लागण झाल्यानं ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्टार्सचे सर्व खेळाडू आणि स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात होता, अशी माहिती आहे. त्यामुळे त्या सर्वांची तातडीने PCR टेस्ट करण्यात येणार आहे. बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदाच एखादी मॅच कोरोनामुळे स्थगित झाली आहे.

मेलबर्न स्टार्सची पुढील मॅच 2 जानेवारी रोजी पर्थ स्कॉचर्स विरुद्धच होणार आहे. बिग बॅश लीगमध्ये सध्या सिडनी सिक्सर्स 21 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. पर्थचे देखील तितकेच पॉईंट्स असून ही टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मेलबर्न स्टार्स 10 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

अ‍ॅशेस सीरिजला फटका

इंग्लंडचे हेड कोच ख्रिस सिल्वरवूड ( Chris Silverwood) यांच्या कुटुंबातील एकाला कोरनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी उपलब्ध नसतील.  या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. सिल्वरवूड त्यांच्या कुटंबासह मेलबर्नमध्येच 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. चौथी टेस्ट सिडनीमध्ये पाच जानेवारीपासून सुरू होत आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, Coronavirus, Cricket