मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न होण्याचं आश्चर्यकारक कारण उघड

भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न होण्याचं आश्चर्यकारक कारण उघड

इंग्लंड दौऱ्यावर फिटनेसच्या कारणामुळे भुवनेश्वर कुमारची (Buvneshwar Kumar) निवड झाली नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी एक नवं कारण पुढं आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) आणि भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी भुवनेश्वर कुमारची (Buvneshwar Kumar)  टीम इंडियात निवड झाली नाही. इंग्लंडमध्ये चांगला रेकॉर्ड असलेल्या या अनुभवी बॉलरची निवड न झाल्यानं अनेकांना धक्का बसला होता. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत चांहली बॉलिंग केली आहे.. चांगल्या कामगिरीनंतरही भुवनेश्वरची निवड न होण्याचं एक आश्चर्यकारक कारण पुढं आलं आहे.

यापूर्वी फिटनेसच्या कारणामुळे भुवनेश्वरची निवड झाली नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.  त्याचवेळी हे नवं कारण पुढं आलं आहे.'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार भुवनेश्वरला आता टेस्ट क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही. त्याला T20 क्रिकेटवर अधिक फोकस करायचं आहे. त्याप्रमाणे त्यानं ट्रेनिंगमध्ये देखील बदल केला असून तो टी 20 मॅचमध्ये 4 ओव्हर टाकून खूश आहे.

'भुवनेश्वर 10 ओव्हर बॉलिंग करण्याची भूक आहे, असं  निवड समितीला वाटत नाही. टेस्ट क्रिकेट तर लांबची गोष्ट आहे. यामध्ये नक्कीच टीम इंडियाचा तोटा आहे. कारण इंग्लंड दौऱ्यासाठी भुवनेश्वर हा सर्वात योह्य भारतीय बॉलर आहे. त्याचीच टेस्ट क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही.' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

IPL 2021 : ...म्हणून आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव? खेळाडूंची 'ही' चूक कारणीभूत

भुवनेश्वर कुमारने 2013 साली भारतीय टेस्ट टीममध्ये प्रवेश केला होता. मात्र त्या वेळेपासून तो केवळ 21 टेस्टच खेळू शकला आहे. त्याने 26.09 च्या सरासरीने 63 विकेट घेतल्या आहेत. तो जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध शेवटची टेस्ट खेळला होता.  भुवनेश्वर कुमारला आगामी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. तेथे तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भुवनेश्वर कुमारला कर्णधार पदच्या शर्यतीमध्ये देखील आहे.

First published:

Tags: India vs england, Team india