खेलरत्‍नसाठी रोहित शर्मा तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवनच्या नावाची शिफारस

खेलरत्‍नसाठी रोहित शर्मा तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवनच्या नावाची शिफारस

रोहित शर्मा याच्यासाठी गत वर्ष शानदार ठरलं. एकाच वर्ल्‍ड कपमध्ये रोहितने पाच शतक ठोकून नवा इतिहास रचला.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma)याच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कारासाठी केली आहे. तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची नावे पाठवली आहेत.

हेही वाचा.. लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

रोहित शर्मा याच्यासाठी गत वर्ष शानदार ठरलं. एकाच वर्ल्‍ड कपमध्ये रोहितने पाच शतक ठोकून नवा इतिहास रचला. गेल्यावर्षी इंग्‍लंडमध्ये झालेल्या वर्ल्‍ड कपमध्ये रोहितने 9 सामन्यात 649 धावा ठोकल्या. मात्र, रोहितला वर्ल्‍ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा रेकॉर्ड मोडता आला नाही. रोहितला केवळ 25 धावा कमी पडल्या.

भारताचा महान फलंदाज सचिनने 2003 वर्ल्‍ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानावर रोहित शर्माने देखील आतापर्यत आतापर्यंत अनेक कर्तब दाखवले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये चार शतक ठोकणारा जगात तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

दुसरीकडे, भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नावावर सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. या कामगिरीसाठी बीसीसीआयनं रोहित शर्माची खेलरत्‍नसाठी तर धवनची अर्जुन पुरस्‍कारासाठी केल्याची माहिती शनिवारी दिली.

अर्जुन पुरस्‍कारासाठी तीन नावं..

रोहितशिवाय शिखर धवन याचं नाव पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. यासोबत भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ वेगवान गेंदबाज इशांत शर्मा (Ishant Sharma)याचंही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. तसेच महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून दीप्ती वनडे आणि टी-20 मध्ये शानदार कामगिरी करत आहे.

हेही वाचा.. धोनी संपणार इंग्लंडच्या 'या' चॅम्पियन खेळाडूचं करिअर, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

इशांत शर्मा याने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे तर ऑल राउंडर दीप्ती शर्माने यंदा टी-20 वर्ल्‍ड कप (T20 World Cup) मध्ये भारत संघाला फायनलपर्यत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.

First published: May 30, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या