पाकसोबत 'मैदान-ए-जंग' सामन्यात विराट नसणार, 'या' खेळाडूकडे धुरा

पाकसोबत 'मैदान-ए-जंग' सामन्यात विराट नसणार, 'या' खेळाडूकडे धुरा

बीसीसीआयच्या निवड समितीने आज आशियाई कपसाठी टीम इंडियाची घोषणा केलीये

  • Share this:

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : आशियाई कपसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहे. निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिलाय. आशियाई कपसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

तसंच शिखर धवनकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. त्याशिवाय अंबाती रायडू, मनीष पांडे यांनाही संधी देण्यात आलीये.

बीसीसीआयच्या निवड समितीने आज आशियाई कपसाठी टीम इंडियाची घोषणा केलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून सतत खेळणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला समितीने तृर्तास विश्रांतीचा सल्ला दिलाय. इंग्लंड दौऱ्यात विश्रांतीवर असलेल्या रोहित शर्मावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. दुखापतीतून बरा झालेल्या केदार जाधवचं कमबॅक झालंय. आशियाई कपसाठी त्याची निवड करण्यात आलीये.

तर विकेटकीपर म्हणून नेहमी प्रमाणे एमएस धोनी आपली भूमिका कायम निभावणार आहे. दिनेश कार्तिक दुसरा विकेट कीपर असणार आहे.

हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकुर यांचाही टीममध्ये समावेश असणार आहे. तर 20 वर्षांचा जलद गोलदांज खलील अहमदलाही संधी देण्यात आलीये.

आशियाई कप 15 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये आयोजित करण्यात आलाय. भारताचा पहिला सामना हा 19 सप्टेंबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.

अशी असेल टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (विकेटकीपर), केएल राहुल, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि खलील अहमद

-------------------

PHOTOS :गाई-म्हशी चरायला नेणाऱ्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्णपदक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2018 03:45 PM IST

ताज्या बातम्या