• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, 'इस्रायल दहशतवादी देश'

मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, 'इस्रायल दहशतवादी देश'

इस्रायल आणि पॅलस्टाईन यांच्यामध्ये सध्या आर-पारचा संघर्ष सुरु (Israel-Palestine conflict) आहे. या संघर्षात दोन्हीकडच्या अनेकांनी जीव गमावला आहे.

 • Share this:
  लाहोर, 12 मे: मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदी भोगत असलेला पाकिस्तानचा बॅट्समन उमर अकमल (Umar Akmal) यानं इस्रायल (Israel) हा दहशतवादी देश असल्याचा आरोप केला आहे. इस्रायल आणि पॅलस्टाईन यांच्यामध्ये सध्या आर-पारचा संघर्ष सुरु (Israel-Palestine conflict) आहे. या संघर्षात दोन्हीकडच्या अनेकांनी जीव गमावला आहे. अकमलनं या विषयावर ट्विट करत इस्रायल हा दहशतवादी देश असल्याचं जाहीर केलं आहे. 'पॅलस्टाईन तुम्ही एकटे नाही. प्रत्येक मुस्लीम हा तुमच्या सोबत आहेत. इस्रायल हा दहशतवादी देश आहे. पॅलस्टाईनच्या मुसलमानांना मारणं बंद करा. मानवअधिकाराचे कैवारी आता कुठं आहेत?' असा प्रश्व अकमलनं विचारला आहे. उमर अकमलला मॅच फिक्सिंग प्रकरणात 12 महिन्यांच्या बंदीसह 42.5 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकमलनं दंडाची रक्कम हप्त्यांमध्ये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) हा प्रस्ताव फेटाळला आहे. ही रक्कम जमा केल्याशिवाय त्याला भ्रष्टाचार विरोधी पथकानं तयार केलेल्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. अकमल फेब्रुवारी 2020 पासून क्रिकेटपासून दूर आहे. दिग्गज क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा, WTC फायनल असेल शेवटची मॅच उमर अकमलनं सट्टेबाजांनी केलेल्या फोनची माहिती पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नव्हती. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणात उमरबाबत पक्षपात झाल्याचा आरोप त्याचा भाऊ कमरान अकमल (Kamran Akmal) यानं केला आहे. त्यानं भावाच्या दंडाची रक्कम भरण्याची तयारी देखील दाखवली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: