कोहलीच्या ‘नो स्लेजिंग’ विधानाने हैराण झाला ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू

कोहलीच्या ‘नो स्लेजिंग’ विधानाने हैराण झाला ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू

कोहलीने स्लेजिंग केली नाही तर मला आश्चर्य वाटेल

  • Share this:

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने ‘आता प्रतिस्पर्ध्यासोबत भांडायची त्याला गरज नाही,’ असे विधान केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिंसचा या विधानावर अजिबात विश्वास नाही. पॅट म्हणाला की, विराट कोहलीकडून होणाऱ्या स्लेजिंगसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला तयार रहायला हवं.

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी कोहलीने स्पष्ट केले होते की, सामन्यात आता स्लेजिंग करण्याची आम्हाला गरज नाही. कोहलीच्या या वक्तव्यावर बोलताना पॅट म्हणाला की, ‘प्रसारमाध्यमांसमोर कोहली म्हणाला की तो आता स्लेजिंग करणार नाही. कोहलीने स्लेजिंग केली नाही तर मला आश्चर्य वाटेल. तो फार खेळाडू वृत्तीचा आहे. त्याचा हाच गुण त्याला यशस्वी बनवतो. आम्ही यासाठी पूर्ण तयार आहोत. असं असलं तरी आमच्यासाठी तो इतरांप्रमाणेच एक प्रतिस्पर्धी असेल.’

वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा

First published: November 19, 2018, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading