News18 Lokmat

पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलेल्या मुश्फिकुर रहीमला मिळाले कधीच न विसरता येणारे दुःख

या सामन्यात त्याच्या हातून एक अशी चूक झाली जी आजन्म त्याच्या लक्षात राहील

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2018 06:13 PM IST

पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलेल्या मुश्फिकुर रहीमला मिळाले कधीच न विसरता येणारे दुःख

एशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध करो या मरो सामन्यात बांग्लादेशचा यष्टीरक्षक मुश्फिकुर रहीमने जबरदस्त फलंदाजी केली. रहीमने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३० वे अर्धशतकही झळकावले. मात्र या सामन्यात त्याच्या हातून एक अशी चूक झाली जी आजन्म त्याच्या लक्षात राहील.

मुश्फिकुर रहीम पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी खेळू शकला नाही. रहीम ९९ धावा करुन बाद झाला.

मुश्फिकुर रहीम बांग्लादेशचा पहिला खिलाडी आहे, जो एकदिवसीय, टी२० आणि कसोटी सामन्यात ९९ धावांवर बाद झाला आहे.

एशिया कपमध्ये बांग्लादेशसाठी मुश्फिकुर रहीमने सर्वाधिक २९७ धावा केल्या. पहिल्याच सामन्यात रहीमने श्रीलंकेविरुद्ध १४४ धावा केल्या.

एशिया कपमध्ये धावा करण्यात रहीम दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर शिखर धवन आहे. धवनने दोन शतकांसह सर्वाधिक ३२७ धावा केल्या आहेत.

एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात रहीम दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर शिखर धवन आहे. धवनने दोन शतकांसह सर्वाधिक ३२७ धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...