News18 Lokmat

IND vs WI: विंडीजला मोठा झटका, टी-२० मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर

भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान आज पहिला टी-२० सामना कोलकात्यात रंगणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2018 04:28 PM IST

IND vs WI: विंडीजला मोठा झटका, टी-२० मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर

04 नोव्हेंबर :  टी-२० मालिकेच्याआधीच वेस्टइंडीज टीमला धक्का बसला आहे. विंडीजचा स्टार खेळाडू आणि आॅलराऊंडर आंद्रे रसैल भारताविरुद्ध खेळणार की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आंद्रे रसैल भारताविरुद्ध टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे.


ईएसपीएन वेबसाईटच्या वृत्तानुसार, आंद्रे रसैलला दुखापत झाल्यामुळे टी-२० मालिका खेळू शकणार नाही. रसैल अजून भारतात पोहोचू शकला नाही.


गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे रसैलवर उपचार सुरू आहे. दुखापतीतून बाहेर पडण्याचा रसैल प्रयत्न सुरू आहे. अशातच २१ नोव्हेंबरला संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या टी-२० टुर्नामेंटमध्ये सुरुवातीआधीही रसैलची फिटनेस टेस्ट होणार आहे.

Loading...


वेस्टइंडीज क्रिकेट निवड समितीला विश्वास आहे की, रसैल दुखापतीतून बाहेर पडले आणि बांग्लादेश दौऱ्यात टीमसोबत सहभाग होईल.


भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान आज पहिला टी-२० सामना कोलकात्यात रंगणार आहे. संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...