मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'ती' PSL ची क्षमताच नाही! माजी क्रिकेटपटूनं दिलं PCB अध्यक्षांना रोखठोक उत्तर

'ती' PSL ची क्षमताच नाही! माजी क्रिकेटपटूनं दिलं PCB अध्यक्षांना रोखठोक उत्तर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठं वक्तव्य केले होते. राझा यांना त्यावर रोखठोक उत्तर मिळालं आहे.

    मुंबई, 17 मार्च : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठं वक्तव्य केले होते. आम्ही पीएसएलमध्ये लिलावाचं मॉडेल आणलं आणि पर्स वाढवली तर स्पर्धा आयपीएलशी असेल. मग बघू पीएसएलपेक्षा जास्त महत्त्व आयपीएलला कोण देतं ते,' असा दावा राजा यांनी केला होता. राजा यांच्या वक्तव्याला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) रोखठोक उत्तर दिलं आहे. पीएसएलमध्ये सध्या असलेल्या ड्राफ्ट सिस्टीमपेक्षा लिलाव प्रक्रिया लागू करण्याची गरज असल्याचं रमीझ राजा यांनी व्यक्त केली होती.  'मार्केट आमच्यासाठी अनुकूल आहे, पण याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही फ्रॅन्चायजींच्या मालकांसोबत बैठक घेऊ. हा पैशांचा खेळ आहे. पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढली तर आमचा सन्मान वाढेल. या बदलानंतर बरेच क्रिकेटपटू आयपीएलपेक्षा पीएसएलमध्ये खेळणं पसंत करतील,' असा विश्वासही राजा यांनी व्यक्त केला. ...ती PSL ची क्षमताच नाही! टीम इंडियाचा माजी ओपनर आकाश चोप्रानं राजा यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितलं की, 'पीएसएलमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला तरी कोणताही खेळाडू 16 कोटींना विकला जाणार नाही. कारण  बाजारामधील परिस्थिती तसं होऊ देणार नाही.' मागील आयपीएल ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सनं ख्रिस मॉरीसला 16 कोटींमध्ये खरेदी केले होते. आकाश चोप्राने पुढे सांगितले ती, 'स्पर्धेचे मीडिया राईट्स विकल्यानंतर पैसा येतो. त्याच्या आधारावर लीगचे आणि त्यामधील टीमच्या किंमतीचे विश्लेषण करता येते. तुम्ही पर्सचे विभाजन करता आणि लीग सुरू करता. ऑक्शन किंवा ड्राफ्ट दोन्हीमध्येही हीच पद्धत वापरली जाते. IPL 2022 : फॅनच्या गुगलीवर धोनीचा सिक्सर, 'बीवी नंबर -1' सांगून केली बोलती बंद! VIDEO रमीझ भाई (रमीझ राजा) यांनी सांगितले की पीएसएलमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यास सुरूवात झाली तर त्याची किंनत वाढेल. पण पीएसएलमध्ये कोणताही खेळाडू 16 कोटींना विकला जाणार नाही. हे शक्यच नाही. तेथील बाजारातील परिस्थिती तसं होऊ देणार नाही हे स्पष्ट आहे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या