Home /News /news /

जितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, उच्चशिक्षित तरुणाचा प्रताप

जितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, उच्चशिक्षित तरुणाचा प्रताप

सुनिल हा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने एमएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसंच तो एमआयडीसी येथे एका कंपनीमध्ये तो कामाला देखील आहे.

ठाणे, 22 डिसेंबर : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावाने एक बनावट फेसबुक (Facebook) अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लिल भाषा वापरुन शिवीगाळ करणाऱ्या एका तरुणाला ठाणे सायबर सेलने अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुनिल राजे पवार आहे. त्याला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे. सुनिल हा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने एमएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. औरंगाबाद मधील वैजापूर येथे सुनिल राहत असून वाळूंज एमआयडीसी येथे तो कामाला देखील आहे. सुनीलने मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक अकाऊंट का बनवले? कोणाच्या सांगण्यावरून बनवले? त्या मागे त्याचा काय उद्देश होता? हे अजून स्पष्ट झालं नाही. ...आणि पुणेकर झाले शहाणे, रानगवा सुखरुप माघारी परतला! इंजीनिअर अनंत करमुसे या तरुणाला मारहाण झाली होती. या घटनेनंतर एप्रिल महिन्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक खाते बनवण्यात आल्याची माहिती सायबर सेलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 18 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील क्रांतिनगर सिडको येथून सुनील याला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.  त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. जॅक कॅलिसची नवी इनिंग, या टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजयअमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधन तीर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजीतकुमार तायडे आदींच्या पथकाने चतुराईने सुनीलला अटक केली. मात्र, सुनिल हा कोणत्याही राजकीय पक्षासोबत किंवा राजकीय व्यक्तीसोबत काम करत नसून त्याने हे का केले याबाबत पोलीस आता तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: जितेंद्र आव्हाड

पुढील बातम्या