News18 Lokmat

काँग्रेसला आणखी एक धक्का, महाआघाडीसाठी 'सीपीएम'चाही 'लाल झेंडा'

भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी तयार करण्यात्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आणखी एक धक्का बसलाय. भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (सीपीएम) आघाडीस नकार दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2018 08:01 PM IST

काँग्रेसला आणखी एक धक्का, महाआघाडीसाठी 'सीपीएम'चाही 'लाल झेंडा'

नवी दिल्ली, ता.9 ऑक्टोबर : भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी तयार करण्यात्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आणखी एक धक्का बसलाय. भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (सीपीएम) काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करायला नकार दिला आहे. पक्षाच्या दिल्लीत झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीआधी कांग्रेससोबत आघाडी करणार नाही. निवडणुकीनंतर विचार करू असं पक्षानं मंगळवारी जाहीर केलं.

सीएमची तीन दिवसांची पॉलिट ब्युरोची बैठक मंगळवारी संपली. एप्रिल महिन्यात पक्षाचं महाअधिवेशन होणार आहे. आणि त्याच दरम्यान निवडणुकाही होणार आहेत. पण काँग्रेस सोबत न जाण्यावर पक्ष ठाम आहे. सर्व मुद्यांचा बैठकीत विचार करण्यात आला आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षानं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर सर्व पर्याय खुले राहितील असंही पक्षानं जाहीर केलंय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्या निवडणुकांसाठीही महाआघाडी होऊ शकली नाही. बसपा आणि सपाने काँग्रेससोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मायावती यांनी तर काँग्रेस अहंकारी असल्याचा आरोप केलाय. प्रादेशिक पक्षांना काँग्रेस महत्व देत नसल्याचं सांगत त्यांनीही महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली होती.

फक्त काँग्रेसने भाजपला रोखणं सध्याच्या राजकीय स्थितीत शक्य नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं स्थानिक राजकारण हे वेगळं असल्याने महाआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...