• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • एप्रिलमध्ये कोरोनामुळे झाला होता मृत्यू; जुलैमध्ये त्यालाच कोरोना लशीचा दुसरा डोस दिल्याचा आला मेसेज

एप्रिलमध्ये कोरोनामुळे झाला होता मृत्यू; जुलैमध्ये त्यालाच कोरोना लशीचा दुसरा डोस दिल्याचा आला मेसेज

या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा अनेक व्यक्तींच्या नातेवाईकांना कोविन अॅपव्दारे (CoWin App) लसीबाबत असे मेसेज पाठवण्यात येत आहेत.

  • Share this:
गांधीनगर (गुजरात), 19 जुलै : देशातील अनेक राज्यांमध्ये आता कोरोनाची (Coronavirus second wave) दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि लसीकरण यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. देशात लसीकरणाने वेग घेतलेला असताना, दुसरीकडे या अभियानातील त्रुटी (Errors in vaccination) देखील समोर येत असल्याचं गुजरातमधील एका घटनेवरुन दिसतं. लसींचा तुटवडा, नियोजनाचा अभाव आदी त्रुटी या अभियानात आतापर्यंत दिसून आल्या. परंतु, गुजरातमधील (Gujarat) एका व्यक्तीचा एप्रिलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र जुलैमध्ये या मृत व्यक्तीच्या मुलाच्या मोबाईलवर एक मेसेज (Message) आला. त्यात तुमच्या वडिलांना लसीचा (Vaccine) दुसरा डोस दिला आहे, अभिनंदन. असं नमूद करण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत असून, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये घडलेला हा पहिला प्रकार नसून, ज्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा अनेक व्यक्तींच्या नातेवाईकांना कोविन अॅपव्दारे (Cowin App) लसीबाबत असे मेसेज पाठवण्यात येत आहेत. या सर्व प्रकाराविषयी जाणून घेऊया सविस्तर... गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील साइगम तालुक्यातील रादोसन गावातील वर्सीभाई परमार यांचे वडिल हरिजी लक्ष्मण परमार यांचा 23 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, तुमच्या वडिलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस दिला आहे, अभिनंदन असा मेसेज 14 जुलैला वर्सीभाई यांच्या मोबाईलवर आला. हा मेसेज वाचून वर्सीभाई यांनी प्रशासनाविरोधात (Administration) तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यांचे वडिल हरिजी यांना लसीचा पहिला डोस देखील मिळाला नव्हता. त्यामुळे प्रशासनाची असंवेदनशीलता पाहून वर्सीभाई यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याचे एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य; Video पाहून देशभरातून व्यक्त होतोय संताप याबाबत वर्सीभाई यांनी सांगितले की, माझे वडिल हरिजी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर तीन दिवस बेडसाठी मला रुग्णालयात चकरा माराव्या लागल्या. पालनपूर सिव्हिल रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती. अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. चकरा मारुनही माझ्या वडिलांना बेड मिळाला नाही. तीन दिवसांनी अथक प्रयत्नांनंतर थराडमधील एका खासगी रुग्णालयात बेड मिळाला परंतु, वेळ निघून गेली होती. ऑक्सिजन सॅच्युरेशन घटल्यानं 23 एप्रिलला माझ्या वडिलांचा मृत्यू (Death) झाला. राज्यातील योग्य व्यक्तींना लस मिळावी, आणि गरजू व्यक्तींना याबाबत मेसेज पाठवण्याची तसदी प्रशासनाने घ्यावी, असा सल्ला हरिजी यांचे जावाई शिवराम यांनी दिला आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, वर्सीभाई यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची पोलखोल करताना सांगितले की माझ्या वडिलांना लसीचा पहिला डोसही मिळाला नव्हता. एक व्यक्ती उपचारांअभावी मृत्यूमुखी पडते आणि प्रशासन अशा व्यक्तीस कोविड-19ची लस दिल्याचा मेसेज पाठवते, हा सर्व प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. यातून प्रशासनाला काय साध्य करायचे हेच समजत नाही. माझ्या वडिलांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन मिळाला असता, तसेच लसीचा पहिला डोस मिळाला असता तर कदाचित ते बचावले असते. रुग्णांसाठीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन अशा पध्दतीचा मेसेज पाठवणं हे खेदजनक आहे.
First published: