News18 Lokmat

गो हत्या करून काढला पळ, पोलीस आडवे येताच त्यांनाही उडवलं

पिंपरी-चिंचवड परिसरातून गो-मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने पोलिसांना आपल्या वाहनाची धड़क देऊन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 12:37 PM IST

गो हत्या करून काढला पळ, पोलीस आडवे येताच त्यांनाही उडवलं

पुणे, 13 ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड परिसरातून गो-मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने  पोलिसांना आपल्या वाहनाची धड़क देऊन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेत दीघी पोलीस कर्मचारी  सूरेश शिंदे आणि त्यांचे इतर 3 सहकारी जखमी झाले आहेत. पिंपरी शहराजवळील दीघी आळंदी रोडवरील मॅगझिन चौका शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत काही लोक गाईची कत्त्तल करून ते मांस अवैधरित्या विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता.

या धरपकडेमध्ये आरोपींना पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी त्या वाहनाला आडवे गेले, तेव्हा संबंधित आरोपींनी पोलिसांना धड़क देऊन गाडी पुढे नेली. यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थ पोलिसांच्या मदतीला धाऊन आले. तेव्हा आरोपींनी गो-मांसाने भरलेली गाडी घटनस्थळीच सोडून पळ काढला. या प्रकरणी दीघी पोलीस ठाण्यात 4 अज्ञातांविरोधात  जीवे मारण्याचा प्रयत्न आणि  गोवंश हत्या बंदी कायद्या अंतर्गत  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2018 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...