राज्याला कोरोनाचे धक्के सुरूच, आज विक्रमी 6364 रुग्णांची भर; एकूण संख्या गेली 2 लाखांच्या जवळ

राज्याला कोरोनाचे धक्के सुरूच, आज विक्रमी 6364 रुग्णांची भर; एकूण संख्या गेली 2 लाखांच्या जवळ

मुंबईत आज 1338 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली संख्या 82,074वर गेली आहे. तर 73 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 4762 वर गेला आहे.

  • Share this:

मुंबई 3 जुलै: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे विक्रम करत आहे. या धक्क्यांनी राज्य हादरुन गेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 6364 रुग्ण आढळून आलेत. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा हा 1,92,990 वर गेला आहे. तर आज 198 मृत्यूची नोंद झाली. यातले 150 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधले असून 48 हे त्या आधीचे आहेत. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ही 8376 वर गेली आहे.

मुंबईत आज 1338 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली संख्या 82,074वर गेली आहे. तर 73 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा  4762 वर गेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरात आता पुन्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं शहराच्या महापौर माई ढोरे यांनी सांगितलं. अशाच प्रकारे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक भागांमध्येही पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा -  कोरोनाने पहिल्यांदाच 24 तासांत गाठला भयानक टप्पा, 'या' आकडेवारीनं दिला दिलासा

महापौर म्हणाल्या, शहर पूर्णकाळ लॉकडाउन करता येणार नाही, मात्र आठवड्यातील गुरुवार आणि रविवारी त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरात अशी परिस्थिती असतानाच आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे रुगणांचे मोठे हाल होत आहेत. अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ झाली आहे.

आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, गेल्या 24 तासांत 379 लोकांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

हे वाचा -  भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

देशात सर्वात गुरुवारी जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले.  तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे.

First published: July 3, 2020, 8:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading