मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

"मासिक पाळीच्या आधी आणि नंतर 5 दिवस Covid Vaccine घेऊ नये" व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये किती तथ्य? जाणून घ्या

"मासिक पाळीच्या आधी आणि नंतर 5 दिवस Covid Vaccine घेऊ नये" व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये किती तथ्य? जाणून घ्या

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

Covid-19 Vaccine: 1 मे पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 24 एप्रिल: कोरोना विषाणूची दुसरी लाट देशभरात पहायला मिळत आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी भारत सरकारने लसीकरण (Vaccination program) मोहिमेचा वेग अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे की, मासिक पाळीच्या (menstruation) दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे.

व्हायरल होणार मेसेज नेमका काय?

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "महिलांनी मासिक पाळीच्या (periods) 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये." व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळेच आता सरकारकडून यासंदर्भात अधिक माहिती आणि स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Covid-19 Vaccine Free: महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देणार? पाहा अजित पवार काय म्हणाले

Viral होणाऱ्या मेसेजमधील दाव्यात किती तथ्य?

सरकारकडून सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोविड प्रतिबंधक लस घेऊ नये असा दावा करणारा मेसेज खोटा आहे. अफवांना बळी पडू नका.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा ट्विट करुन सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यातील माहिती खोटी असून मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका.

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस

येत्य 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे कोविड प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी cowin.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपल्या नावाची नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे.

First published:

Tags: Coronavirus, Periods, Vaccinated for covid 19