कोरोनापासून बचावासाठी पुरेसं नाही 1 मीटर अंतर, तब्बल 8 मीटरपर्यंत जाऊ शकतो व्हायरस

कोरोनापासून बचावासाठी पुरेसं नाही 1 मीटर अंतर, तब्बल 8 मीटरपर्यंत जाऊ शकतो व्हायरस

Coronavirus 3 नव्हे तर तब्बल 27 फूटांपर्यंत जाऊ शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 एप्रिल : कोरोनापासून (coronavirus) बचावाचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टेंसिंग (social distancing). कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ आली तर तिच्यात आणि आपल्यात किमान एक मीटर अंतर ठेवावं आणि याचं पालन सार्वजनिक ठिकाणी होताना दिसतं आहे. मात्र कोरोनाव्हायरस हा 1 मीटर नव्हे तर तब्बल 8 मीटरपर्यंतही जाऊ शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

अमेरिकेतल्या Massachusetts Institute of Technology च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरस 27 फूट अंतरापर्यंत व्यक्तीलाही संक्रमित करू शकतो आणि मोकळ्या हवेत एक तासापेक्षाही जास्त वेळ राहू शकतो.

खोकला आणि सर्दीच्या गतिशीलतेचा अभ्यास करणारे प्राध्यापक लिडीया बॉरोइबा यांनी दावा केला आहे की, "6 फूट अंतर सोशल डिस्टेंसिंगचे दिशानिर्देश 1930 च्या दशकातील जुन्या मॉडेलवर आधारित आहे"

जीवघेण्या अशा कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगच्या ज्या जुन्या गाइडलाइनची अंंमलबजावणी केली जाते आहे, ती जास्त प्रभावी नाही. यामुळे आजार पसरण्यापासून रोखण्यास फारशी मदत मिळणार नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल

कोरोनाची आणखी नवी लक्षणं, दुर्लक्ष करू नका

कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या झपाट्याने वाढते आहे. सर्दी, खोकला, ताप ही व्हायरसची सामान्य लक्षणं आहेत. तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणं न दिसता इतर लक्षणं दिसत आहेत. अशाच काही लक्षणांना ओळखण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.

डायरिया: कोरोनाच्या रुग्णांमध्ये डायरिया असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकन न्यूज वेबसाईट बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या 10 पैकी एका रुग्णाला पचनसंबंधी समस्या असते.

मळमळ: लँसेट जर्नलमधील रिपोर्टनुसार चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या फक्त 3 टक्के लोकांना डायरियाची समस्या होती. तर 5 टक्के लोकांना मळमळ जाणवत होती.

ब्रेड, बिस्कीटमुळे पसरतो कोरोनाव्हायरस? WHO च्या फोटोमागचं तथ्य काय?

अस्वस्थता: अमेरिकेच्या वॉशिंग्टन नर्सिंग होमच्या रिपोर्टनुसार, जवळपास एक तृतीयांश लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली मात्र निम्म्या लोकांमध्ये याची लक्षणं दिसली नाहीत. तर काही रुग्णांमध्ये अस्वस्थता दिसून आली.

उठण्यात त्रास: सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) च्या मते, उठता येत नसेल आणि अस्वस्थता वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

थंडी आणि स्नायूंमध्ये वेदना: WHO च्या रिपोर्टनुसार 11 टक्के लोकांमध्ये थंडी आणि 14 टक्के लोकांमध्ये स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणं दिसून आलीत. कोरोनाची गंभीर लक्षणं दिसण्यापूर्वी हे संकेत मिळतात.

डोकेदुखी आणि चक्कर: लँसेटच्या अभ्यानुसार जवळपास 8 टक्के रुग्णांना डोकेदुखीची समस्या होती तर काही जणांना चक्करही येत होती. अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकनुसार, पुन्हा पुन्हा चक्कर येणं हे गंभीर लक्षणं असू शकतं.

ही लक्षणं म्हणजे कोरोनाव्हायरचीच असतील असं नाही. मात्र खबरदारी म्हणून डॉक्टरांकडे जाऊन तपासणी जरूर करा.

संकलन, संपादन - प्रिया लाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 09:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading