राज्याला 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसणार, तज्ज्ञगटाच्या अहवालातील 13 मोठ्या गोष्टी

राज्याला 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसणार, तज्ज्ञगटाच्या अहवालातील 13 मोठ्या गोष्टी

राज्याच्या महसूलात 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसण्याचा निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : कोरोना व्हायरस थैमानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञगटाची निवड केली होती. या समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालातून समितीने राज्य सरकारला भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली आहे. तसंच काही महत्त्वाचे सल्लेदेखील दिले आहेत. राज्याच्या महसूलात 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसण्याचा निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे.

तज्ज्ञगटाच्या अहवालातील 13 महत्त्वाच्या गोष्टी

1. कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था कशा स्वरुपात उभारायची याबाबत तज्ञांचा सल्ला

2. राज्याची कर्ज घेण्याची क्षमता 3 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याची शिफारस

3. बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा प्रकल्प, वाहतूकसारखे महसूल मिळवून देणारे प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची शिफारस

4. दोन चाकीवर एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा, चार चाकी गाडीत दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा द्यावी अशी सूचना

5. बसमध्ये सँनिटायझर असावे, प्रवासात मास्क वापरणं बंधनकारक

6. उद्योगाच्या ठिकाणी तापमान तपासणे, लक्षणं आढळल्यास रुग्णांची तपासणी करण्याची सूचना

7. मानसिक रोग बळावण्याची शक्यता असल्यानं राज्य पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्याची शिफारस

8. मेट्रो, रस्त्यांचे प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची सूचना

9. जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी क्षेत्रासाठी कंट्रोल रुम सुरू करण्याची शिफारस

10. मुंबईतल्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची सूचना

11. कामगार उपलब्ध करुन देण्यासाठी पावलं उचलण्याची गरज

12. वस्तूंची ने आण करणाऱ्या वाहतुकीची विनाअडथळा सुविधा

13. केंद्राकडे विशेष कोव्हीड पॅकेज मागण्याची सूचना

दरम्यान, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अर्थ सचिव राजीव मित्तल, कृषी सचिव एकनाथ डवले आदी तज्ञगट सदस्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा अहवाल उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला.

सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी सर्वश्री जे. एस. साहनी, सुबोधकुमार, रामनाथ झा, उमेशचंद्र सरंगी, जयंत कावळे, सुधीर श्रीवास्तव यांच्यासह अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, आर्थिक सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, कृषी सचिव आदी तज्ञांचा समावेश असलेल्या गटाने हा अहवाल तयार केला आहे.

ऑनलाइन क्लासमध्ये मुलाने पोस्ट केला पॉर्न PHOTO, ग्रुपवर केलं अश्लील चॅट

First published: May 9, 2020, 1:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या