मुंबई, 09 ऑगस्ट : कोरोनाच्या या महासंकटात आरोग्य सेवेपासून ते मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऱ्यांपर्यंत, पोलिसांपासून ते अत्यावशक सेवा पुरवणारे कोरोना वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा करत आहेत. जानेवारीपासून जवळपास ही सेवा निरंतर सुरू आहे. अनेक तास काही न खाता पिताही त्यांना राहावं लागतं. कामाचा ताण आणि तहान भूक विसरून केवळ सेवा करत असलेल्या या कोरोना वॉरियर्सपैकी एकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या फोटोवरून आपण केवळ अंदाज लावला तरी आपल्या अंगावर काटा उभा राहिल. कोरोना वॉरियर जे काम करतात त्याला तोड नाहीच आहे. अहोरात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कोरोना वॉरियर जेव्हा थकतो आणि भूमीचा धरणीमातेचा आधार घेतो तेव्हाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोना से मृत एक महिला के शव को दफ़नाने से पहले थका हुआ एक स्वास्थ्यकर्मी. ‘करोना वॉरीअर’ के योगदान को ना क़ेवल आज बल्कि पूरे इतिहास में याद रखा जाएगा. 🙏🙏
एका महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी थकलेला अवस्थेत कोरोना वॉरियर जमिनीवर पहूडल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या कोरोना वॉरियरचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या कामाला आणि सेवेला सलाम केला आहे. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून केलेल्या या कामासाठी नेटकऱ्यांनी कडक सॅल्युट केला आहे.
भारतात कोरोनाची काय आहे स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे.
देशात कोरोनामुळे 933 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 27 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.