Home /News /news /

धक्कादायक! देशातील कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी 1 लाख पार, वाचा 24 तासातले अपडेट्स

धक्कादायक! देशातील कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी 1 लाख पार, वाचा 24 तासातले अपडेट्स

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्य 1 लाखाहून अधिक झाली आहे.

    मुंबई, 03 ऑक्टोबर : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्य 1 लाखाहून अधिक झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनामुऴे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. तर राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारीही सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाकडून नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार देशात 79,476 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.देशातील कोरोनाची आकडेवारी आतापर्यंत 64,73,545 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 भारतात कोरोनामुळे 1,069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या 1,00,842 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात 9 लाख 44 हजार 996 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 54 लाख 27 हजार 706 वर पोहोचली आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात 11,32,657 कोरोना तपासणी झाली. हे वाचा-मुंबईची 'हर्ड इम्युनिटी'च्या दिशेनं वाटचाल? झोपडपट्टी भागात संसर्ग दरात घट आयसीएमआरने म्हटले आहे की कोरोना तपासणीमुळे रुग्णांना शोधणे सोपे होते आणि ते लवकर निरोगी होतात. अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनामुळे मृत्यू सर्वात जास्त मृत्यू होणाऱ्या संख्येच्या आकडेवारीनुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड -19 चे 15,591 नवीन रुग्ण आढळले आणि राज्यात संक्रमित होणाऱ्यांची संख्या 14,16,513 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात आणखी 424 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा 37,480 झाला आहे. विभागातर्फे सांगण्यात आले की, 13,294 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून आतापर्यंत हा आकडा 11,17,720 वर पोहोचला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या