मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO : बेळगावात संतप्त जमावाकडून रुग्णालयावर तुफान दगडफेक, रुग्णवाहिकाही पेटवली

VIDEO : बेळगावात संतप्त जमावाकडून रुग्णालयावर तुफान दगडफेक, रुग्णवाहिकाही पेटवली

दोन दिवसांपासून नातेवाईकांनी या रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.

बेळगाव, 23 जुलै: कोरोनाचा विळखा राज्यात वाढत असतानाच बेळगावात सिव्हिल हॉस्पिटलची संतप्त जमावाकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी संतापलेल्या जामावाने रुग्णालयाबाहेर उभी असलेली रुग्णवाहिका देखील पेटवून दिली. ही घटना बेळगाव शहरातल्या घी गल्लीत घडली. 55 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. दोन दिवसांपासून नातेवाईकांनी या रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानं वातावरण तापलं. रुग्णालयाकडून नीट उत्तर मिळत नसल्यानं नातेवाईकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हे वाचा-पुणं झालं Corona Hotspot : देशात सर्वाधिक नवे रुग्ण असलेल्या जिल्ह्यातलं चित्र प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यानं अखेर नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि बुधवारी रात्री उशिरा 100 जणांच्या जमावानं रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालयावर दगडफेक करत रुग्णवाहिकाही पेटवून दिली आहे. जवळपास अर्धा तास ही रुग्णवाहिका पेटत होती. याच वेळी कैद्यांना घेऊन आलेल्या पोलीस गाडीवरही जमावाने दगडफेक करत कॉन्स्टेबललाही मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक राज्य सरकारचं हे रुग्णालय असून तासाभरानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवलं असून मोठा अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक रुग्णालयात तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपासही देखील सुरू आहे.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या