चुलत भाऊ-बहिणीचं प्रेम प्रकरण लग्नापर्यंत पोहचलं, पण क्षणात संपवलं आयुष्य

तासगाव तालुक्यातील बोरगाव इथं चुलत बहिणभावामध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला घरातून असलेला विरोध पाहून विषप्राशन करून आत्महत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 09:54 AM IST

चुलत भाऊ-बहिणीचं प्रेम प्रकरण लग्नापर्यंत पोहचलं, पण क्षणात संपवलं आयुष्य

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 27 डिसेंबर : तासगाव तालुक्यातील बोरगाव इथं चुलत बहिणभावामध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला घरातून असलेला विरोध पाहून विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. गणेश बाळासो पाटील (वय 34), सारिका संभाजी पाटील (वय 20) अशी या दोघांची नावं आहेत.

सांगलीच्या बोरगाव इथे पाटील भावकीमध्ये सारिका आणि गणेश हे दोघे शेजारी शेजारी राहतात. ते नात्याने चुलत भाऊ-बहिण लागतात. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र घरातून विरोध होत असल्याने दोघेही काही महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले.

दीड महिन्यांपूर्वी दोघेही घरी परत आले. यावेळी घरच्यांनी त्यांना समजावून सांगत ‘तुम्ही नात्याने भाऊ बहिण आहात, हे समाजापुढे सर्व चुकीचे आहे’, अशी समजूत काढली. मात्र दोघेही उदास हेाते. यानंतर गणेश कोल्हापूर इथं  नोकरीसाठी गेला. तर सारिका घरीच होती.

सोमवारी रात्री 9 च्या सुमारास गणेश गावामध्ये आला. यावेळी त्याने आपण आल्याचे कोणालाच सांगितलं नाही. याचवेळी सारिकादेखील घरामधून बाहेर पडली. पूर्वनियोजित घरापाठीमागे असणाऱ्या द्राक्षबागेमध्ये दोघेही भेटले आणि त्याच ठिकाणी घरच्यांचा विरोध असल्याने नैराश्यापोटी विषप्राषन करून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे.

Loading...

25 डिसेंबरला सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...