मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खटला चालवायचा का? कोर्टाने निर्णय राखून ठेवला!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खटला चालवायचा का? कोर्टाने निर्णय राखून ठेवला!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला दाखल करायचा की नाही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला दाखल करायचा की नाही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती न लिहल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांवर निवडणूक लढवताना दोन गुन्हा दाखल होते. यातील पहिला गुन्हा नागपूरमधील मानहानीचा आहे. तर दुसरा फसवणुकीचा आहे. यातील एक गुन्हा 1996मधील तर दुसरा 1998मधील आहे. या प्रकरणी फडणवीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांकडून आरोपपत्र तयार करण्यात आले नाही. या गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी फडणवीस यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

यासंदर्भातील याचिका याआधी मुंबई उच्च न्यायालयाने फेटळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून बाजून मांडताना असे सांगण्यात आले की, मुख्यमंत्री किंवा राजकीय नेत्यांवर अनेक प्रकारचे गुन्हे किंवा खटले दाखल असतात. याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नाही म्हणून कारवाई होऊ शकत नाही. त्यावर याचिकाकर्त्यांनी दावा केली की, अशा प्रकारची माहिती लपवल्यामुळे कारवाई केलीच पाहिजे.

याआधी या प्रकरणी कोर्टाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवत उत्तर देण्याची मागणी केली होती. आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने असाही प्रश्न उपस्थित केला की, मुख्यमंत्र्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपवली की हा प्रकार चुकून झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुरू आहे.

VIDEO : गाडीत सीटबेल्ट न लावणाऱ्यांसाठी गडकरींचा मोठी घोषणा

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading