मनसेचे नेते हर्षवर्धन जाधवांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, कोर्टाने अर्ज फेटाळला

मनसेचे नेते हर्षवर्धन जाधवांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, कोर्टाने अर्ज फेटाळला

अपक्ष, शिवसेना, मनसे, अपक्ष आणि पुन्हा एकदा मनसेत दाखल झालेल्या हर्षवर्धन जाधव यांना मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 09 मार्च :  औरंगाबादचे मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला आहे. त्यामुळे जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

अपक्ष, शिवसेना, मनसे, अपक्ष आणि पुन्हा एकदा मनसेत दाखल झालेल्या हर्षवर्धन जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा झाला होता. अटक टाळण्यासाठी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आज या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला. हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉटसमोर उभा केलेल्या पान टपरीवरून वाद झाला होता. त्यावेळी जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

2 मार्च रोजी जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला. हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉटसमोर उभा केलेल्या पान टपरीवरून वाद झाला होता. त्यावेळी जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

परंतु, हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. 'हे तर माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे. मी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी मी माझा मुद्दा सोडणार नाही,' असं हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.

नुकताच केला आहे मनसे प्रवेश

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनाआधी मनसेमध्ये काही नेते दाखल झाले होते. कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही पुन्हा मनसेची वाट धरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'कृष्णकुंज'वर हर्षवर्धन जाधव यांनी अधिकृत प्रवेश केला.

हर्षवर्धन जाधव यांची वादग्रस्त राजकीय कारकीर्द

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नुकतंच त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष, पुन्हा मनसे असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

First published: March 9, 2020, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading