गुढीपाडव्याच्या पहाटे सोलापूर हादरलं, गळफास घेत प्रेम युगुलाची आत्महत्या

गुढीपाडव्याच्या पहाटे सोलापूर हादरलं, गळफास घेत प्रेम युगुलाची आत्महत्या

प्रेमाला घरातून विरोध होता. त्यामुळे आत्महत्येच्या 10 दिवस आधी घरातून प्रेमाला विरोध असल्याने मागील १० दिवसापासून घरातून होते बेपत्ता.

  • Share this:

सोलापूर, 06 एप्रिल : संपूर्ण देशभरात आज गुढीपाडव्याचा सण साजरा होत असताना सोलापूरमध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुढीपाडव्याच्या दिनी प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. प्रेमाला घरातून विरोध होता. त्यामुळे आत्महत्येच्या 10 दिवस आधी  घरातून बेपत्ता होते. आज पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील झाडावर या दोघांचा मृतदेह आढळून आला.

प्रेमाला असलेल्या विरोधामुळे अल्पवयीन प्रेयसी आणि सज्ञान प्रियकरानं आपलं आयुष्य संपवलं आहे. तर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा प्रियकरावर दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

सकाळच्या सुमारासा गावातील स्थानिकांनी झाडावर दोघांचा मृतदेह पाहिला यानंतर याची पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी पोलीस आता प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तर यात मृतांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा 'गलती से मिस्टेक'; पाहा काय म्हणाले..

First published: April 6, 2019, 11:18 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading