मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

6 महिन्यांपूर्वीच थाटला होता दोघांनी संसार, पण असा झाला सुखी संसाराचा शेवट

6 महिन्यांपूर्वीच थाटला होता दोघांनी संसार, पण असा झाला सुखी संसाराचा शेवट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जिल्ह्यात एका दाम्पत्यानं (couple has committed suicide) आत्महत्या केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच दोघांनी लग्न केलं होतं.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 10 डिसेंबर: उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून एक हृदय हेलावणारी (shocking news) बातमी समोर येतेय. जिल्ह्यात एका दाम्पत्यानं (couple has committed suicide) आत्महत्या केली आहे. प्रतापगढ जिल्ह्यातील ठाणे कोहदौर भागातील सराय शंकर चिगुडा गावातील रहिवासी असलेल्या एका जोडप्याने विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दोघांवर प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात उपचारादरम्यान सुरु होते. एका पोलीस अधिकाऱ्यानं शुक्रवारी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

हेही वाचा- Love Triangle चा भररस्त्यात तमाशा, पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडला धू-धू धुतलं

पोलीस उपअधीक्षक (प्रादेशिक अधिकारी) नगर अभय पांडे यांनी सांगितलं की, 22 वर्षीय नीलेश वर्मा हे पोलीस ठाणे कोहदौर परिसरातील सराई शंकर चिगुडा गावातील रहिवासी होते. नीलेश यांचं त्यांची वहिणीच्या नातेवाईक 19 वर्षीय रोशनी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी मंदिरात लग्न केलं होतं.

संशयास्पद परिस्थितीत विष खाल्ले

त्यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी दोघांनी विष प्राशन केलं. नातेवाईकांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला एसआरएन हॉस्पिटल, प्रयागराज येथे रेफर केले. उपचारादरम्यान रात्री उशिरा दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मात्र दोघांच्या आत्महत्येचं अद्याप कारण समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Uttar pradesh news