Home /News /news /

Coronavirus: BMC नं उचललं मोठ पाऊल, मुंबईच्या रस्त्यांवर थुंकलात तर पडेल महागात

Coronavirus: BMC नं उचललं मोठ पाऊल, मुंबईच्या रस्त्यांवर थुंकलात तर पडेल महागात

बुधवारी पुण्यात नवीन कोरोना रूग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत बृहनमुंबई महानगरपालिकेने ( BMC) अनेक कठोर पावलं उचलली आहेत.

    मुंबई, 18 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. बुधवारी पुण्यात नवीन कोरोना रूग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत बृहनमुंबई महानगरपालिकेने ( BMC) अनेक कठोर पावलं उचलली आहेत. मुंबईत मंदिरापासून ते थिएटर, मॉल, पब, शाळा, क़ॉलेज अशा सगळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आता मुंबईत आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. मुंबईत रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्यासाठी रस्त्यांवर देखरेख करण्यासाठी मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी एका 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्या माणसाची पत्नीही कोविड19 मध्ये संक्रमित असल्याचं आढळलं आहे. महाराष्ट्रातील या मृत्यूनंतर भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. हे वाचा - पतीनं पाहिला पत्नीचा PORN व्हिडिओ, लग्नाच्या पहिल्या रात्रीच पितळं असं पडलं उघड कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबाबत महाराष्ट्रातील उद्धव सरकारनं मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं की, राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये सुट्टी देण्यात आली नाही. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांच्या मते, निर्णय घेतला आहे की केवळ 50 टक्के लोकांनी कार्यालयात काम करायला जावं. ठाकरे म्हणाले की, मुंबईतील सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही. जर लोकांनी संयम बाळगला नाही आणि अनावश्यक प्रवास करण्यास टाळाटाळ केली तर आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मुंबई हायकोर्टानं केवळ दोन तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून मुंबई उच्च न्यायालय पुढील आदेश येईपर्यंत दोन तास काम करेल. यापूर्वी कोर्टाने म्हटले होते की आवश्यक खटल्यांची सुनावणी होईल आणि या कालावधीत तात्पुरते आणि अंतरिम मदत आदेश सुरू राहतील. हे वाचा - कोरोनाला हरवणारा भारत बनला 5वा देश, औषधं तयार करण्यात होणार मदत दरम्यान, पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण यावर घाबरण्याचं कारण नसून काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यात एकूण 18 तर महाराष्ट्रात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या रुग्ण महिलेचा फ्रान्स आणि नेदरलँड असा प्रवासाचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत त्रास सुरू झाल्याने 15 तारखेलाा चाचण्या केल्या असता त्या पॉझिटिव्ह आल्या. रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे वाचा - BREAKING: पुण्यात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात आकडा 42 वर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या