20 मेपर्यंत भारतातून कोरोना व्हायरसचा सर्वनाश होणार, सिंगापूर युनिव्हर्सिटीचा दावा

20 मेपर्यंत भारतातून कोरोना व्हायरसचा सर्वनाश होणार, सिंगापूर युनिव्हर्सिटीचा दावा

आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं आकडेवारीचं जे विश्लेषण केलं आहे त्यानंतर हा दावा करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : जगभरात कोरोनानं कहर केला आहे. 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 20 मेपर्यंत भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट होईल असा दावा करण्यात आला आहे. सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइन (SUTD) ने हा दावा केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं आकडेवारीचं जे विश्लेषण केलं आहे त्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. भारतातून 20 मेपर्यंत कोरोनाचा नाश होईल तर वेगवेगळ्या देशांमध्ये लवकरच या व्हायरसचा नाश होईल असं सांगण्यात आलं आहे.

16 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाचे रुग्ण आढळणार नाहीत असं याआधी शुक्रवारी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. असं केल्यानं कोरोना व्हायरसवर भारत लवकर नियंत्रण मिळवू शकेल असा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आता देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्रालयाकडून अत्यावश्यक सेवांसह काही दुकानं उघडण्याची परवानगी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये देण्यात आली आहे. कॅन्टोनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रात दुकाने उघडण्यास परवानगी नाही. याशिवाय दारूची दुकाने आणि मॉलची दुकानेही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

हे वाचा-धक्कादायक! डायलेसीसच्या उपचारासाठी गेले आणि रुग्णालयात झाला कोरोना, गमावले प्राण

हे वाचा-महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू, पाहा लेटेस्ट अपडेट

First published: April 26, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading