Home /News /news /

कोरोनाच्या लशीच्या काय होणार परिणाम? उपयोगी ठरणार की नाही, जाणून घ्या

कोरोनाच्या लशीच्या काय होणार परिणाम? उपयोगी ठरणार की नाही, जाणून घ्या

जगभरात सुमारे 6 लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्याच 6 लशींपैकी एक फायझरची लस आहे.

    मुंबई, 03 ऑक्टोबर: कोरोना रोगाच्या साथीपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण जग कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करताना दिसत आहे. पण यामध्ये प्रश्न हा आहे की या लशीपैकी कोणती लस सर्व रुग्णांवर प्रभावी ठरेल? ही लस रुग्णांसाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल हाही प्रश्न आहेच.  त्या विषयी आपण जाणून  घेऊ. भारताबरोबरच संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे सगळेच त्रासले आहेत. त्याचबरोबर वाढतं संक्रमण आणि होणारे मृत्यू अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे कोरोना लस हीच आहे. त्यावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तसेच ही नवीन येणारी लस  रुग्णांत प्रतिकार शक्ती निर्माण करू शकेल का ? किंवा संक्रमण रोखण्यास या लशीची मदत होईल का ? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. अमेरिकन कंपनी फायझर (pfizer) कोरोना लसीवर काम करत आहे. या लशीच्या रुग्णांवरील प्रयोगांचा अंतिम परिणाम काय होत आहेयाचे निष्कर्ष लवकरच जगासमोर येऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी  कोरोना लस उपलब्ध होईल असं आश्वासन दिलं आहे. जगभरात सुमारे 6 लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्याच 6 लशींपैकी एक फायझरची लस आहे. या लशीचा माणसावर काय परिमाण होतो यावर संशोधन सुरू आहे. सायन्स इंफॉर्मटिक्स और अनालिटिक्स कंपनी एयरफिनिटीच्या म्हणण्यानुसार ह्या लसीच्या अंतिम विश्लेषणासाठी आवश्यक कोविड रुग्ण त्याच्याकडे आहेत. आधी ठरवलेल्या निकषांची पूर्तता लशीनी केली तरच त्या लशीची अंतिम चाचणी यशस्वी मानली जाते. जर  76.9% म्हणजे ३२ पैकी २६ रुग्णांवर लसीचा परिणाम होत असेल तरच ती लस कोरोनावर प्रभावी ठरणार आहे. एयरफिनिटीने दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबरपर्यंत फायझर कंपनीच्या लशीची ट्रायल  ३२ रुग्णांवर झाली आहे. कशी ठरवली जाते लसीची अंतिम तारीख इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीनुसार, कोरोनावरील  लशीच्या अंतिम तारखेसाठी क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा आणि प्रोटोकॉल याचं परीक्षण करून तसंच  कोरोना लस बनवणाऱ्या कंपनीचा कोरोना संक्रमित रुग्णांवरील ट्रायलमध्ये निश्चित कोविड केसेसपर्यंत पोचण्यासाठी लागणारा वेळ याच्या निष्कर्षावरून एक कोड बनवला जातो. तसंच ऑक्टोबर महिना संपेपर्यंत कोरोनावरील लशीचा परिणाम होतो की नाही याचा डेटा उपलब्ध होणार आहे अशी माहिती फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी दिली आहे. विशेषज्ञांना शंका दरम्यान, अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संस्थांतील शास्रज्ञ आणि या विषयातील विशेषज्ञांना फायझरच्या या लशीच्या परिणामांबद्दल शंका होती. त्यामुळे अशा 60 शास्रज्ञांनी एक जाहीर पत्र लिहून फायझरला त्याबाबत कळवलं होतं. सुरक्षेची सर्व मानकं या लसीनी पूर्ण केल्याशिवाय रेग्युलेटरी क्लिअरन्ससाठी फायझरने अमेरिकी सरकारकडे अर्जच करू नये असं यात म्हटलं होतं. एयरफिनिटीच्या म्हणण्यानुसार लस कँडिडेट सिनोवैक चे  अनअक्टिवेटेड वायरस डबल-डोस लस (२२ ऑक्टोबर ) मॉडर्नची mRNA बेस्ड डबल-डोस कँडिडेट (25 ऑक्टोबर ) आणि ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनकाची अडेनोवायरस वेक्टर सिंगल डोज लशीचे अंतिम निष्कर्ष २४ नोव्हेंबरपर्यंत येणार आहेत. याशिवाय अमेरिकी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन, रशियामधील  गामालेया इन्स्टिट्यूट आणि चीनमधील  सिनफार्मा आणि  कैनसिनोसुद्धा  कोविड लस बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  ह्या त्या 18 लशींपैकी  आहेत ज्यांच्या फेज २ आणि ३ ट्रायल चालू आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या