मुंबई, 16 ऑक्टोबर : रशियानं नुकतीच कोरोनाची दुसरी लस आणल्याचा दावा केला आहे. पण प्रत्येकापर्यंत ही लस कधी पोहोचणार यासंदर्भात वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच आता ही लस निरोगी युवकांपर्यंत पोहोचायला 2022 पर्यंत वेळ लागू शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेतील महिला शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे.
निरोगी तरुणांना कोरोनाच्या लशीसाठी 2022 पर्यंत थांबावे लागेल. असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली. कोरोनाची लस आणि आरोग्य संस्थेत काम करणाऱ्या तसेच फ्रेंटलाइनवर काम करणाऱ्या कामगारांना ही लस पहिल्यांदा दिली जाणार आहे. त्यानंतर लस कोणत्या टप्प्यातील रुग्णांना आणि नागरिकांना द्यायची याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. सर्वात जास्त धोका असणाऱ्यांना सर्वप्रथम लस पोहोचवणं हे प्राधान्य असेल असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
हे वाचा-आजारांशी लढा देणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक,अभ्यासात आले समोर
सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार निरोगी तरुणांना 2022 पर्यंत कोरोनाच्या लशीसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लस कधी येणार आणि ती घेतल्यानंतर जनजीवन सगळं सुरळीत होईल असा विश्वास लोकांना आहे. पण प्रत्यक्षात असं होणार नाही. कोरोनाची लस आल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवला जाईल आणि त्यानुसार टप्प्या टप्प्यानं ही लस देण्यात येईल.
जग कोरोनाशी (Coronavirus) दोन हात करत असताना दुसरीकडे रशियानं दुसरी कोरोना लस (Russia Covid 19 Vaccine) तयार केल्याची घोषणा केली आहे. याची घोषणा खुद्द अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. पुतिन यांनी माहिती दिली आहे की, रशियाने कोरोनाची दुसरी लस तयार केली आहे. एकीकडे जगभरातील सर्व देशात कोरोनाची लस विकसित करण्याचे काम चालू आहे. काही लसीच्या चाचण्याही घेत आहेत. रशियाने यापूर्वीच स्वतःची कोरोना विषाणूची लस बनवल्याचा दावा केला आहे.