मुंबई, 02 मे : देशात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 11.5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील वेगानं वाढणार्या कोरोना (Corona) रुग्णांना पाहता आता मुंबईला पहिली मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार आहे. वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बृहमुंबई नगरपालिका (बीएमसी) चे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बसचं उद्घाटन केलं.
नवी मुंबईत परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा पुन्हा फज्जा
कोव्हिड-19 टेस्टिंग बसमध्ये कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. यासह या बसमध्ये एक्स-रे परीक्षेची सुविधादेखील उपलब्ध आहे. ज्या बसमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे एक लहान चेंबर बनविला गेला आहे.
(1/2)Hon’ble Health Minister @rajeshtope11 Ji, Hon’ble @AUThackeray Ji & Hon’ble MC Mr Parveen Pardeshi Sir inaugurated the 1st mobile #CovidBus by @mybmcWardGS, for mass screening by using a combination of fever, O2 saturation & AI based Xrays’s for detecting COVID pic.twitter.com/LDIWK4rEc4
— WARD GS BMC (@mybmcWardGS) May 1, 2020
बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणात तपासणीची गरज भासू लागली. ही गरज लक्षात घेता प्रथम कोव्हिड-19 टेस्टिंग बस मुंबईला देण्यात आली आहे. कोरोनो व्हायरस शोधण्यासाठी O2 कॉम्बीनेशन सेच्यूरेशन वापरेल आणि Al बेस्ड एक्स-रे देखील वापरेल.
ट्रम्प यांनी निभावलं मैत्रीचं नातं! अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना मोठी सूट
बीएमसी अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोव्हिड-19 टेस्टिंग बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधासह सुसज्ज आहे. या मदतीनं झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागात कोरोना चाचणी करणं खूप सोपं जाईल. यासह, स्क्रीनिंग दरम्यान उच्च धोका असलेल्या संशयितांना अलग ठेवणं देखील सोपं होईल.
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केली बस
कृष्णा डायग्नोस्टिक आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणं ही कोव्हिड-19 टेस्टिंग बस तयार केली आहे. क्लाऊड ट्रान्सफॉर्मच्या मदतीनं रेडिओलॉजी विभागाचे तज्ञ आणि डॉक्टर आता कोरोनो विषाणूचे रुग्ण सहज शोधू शकतील.
पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा, आता शहरातच होणार कोरोनाची चाचणी