Home /News /news /

घरात अडकलेल्यांसाठी खाकी वर्दीतला माणूस आला धावून, तुम्हीही कराल पोलिसांचं कौतुक

घरात अडकलेल्यांसाठी खाकी वर्दीतला माणूस आला धावून, तुम्हीही कराल पोलिसांचं कौतुक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

    संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 25 मार्च :  कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मात्र, यादरम्यान सर्वसामान्य नागरिक जीवनावश्यक आणि गरजेच्या वस्तू तसंच औषधींपासून वंचित राहू नये म्हणून अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर यांनी एक आगळीवेगळी योजना तयार केली आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर यांच्या या योजनेमुळे पोलीसच आता जीवनावश्यक साहित्य आणि औषधी घरपोहोच देणार असल्याचं सांगितलं. शहरातील दोन पोलीस आयुक्त आणि शहरातील  सर्व पोलीस ठाणे यांचे फोन नंबर पोलीस आयुक्त बाविस्कर यांनी जाहीर केले आहे. हेही वाचा - आयसोलेशन वॉर्डमधील भीतीदायक 12 दिवस, कोरोनाची लढाई जिंकलेला रुग्ण म्हणाला... प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्पलाइनच्या धर्तीवर हेल्पलाइन राहणार आहेत. या नंबरवर आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात फोन केल्यास फोन वरच अत्यावश्यक वस्तूंची माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या व्यक्ती घरपोच ते साहित्य तुमच्या घरी आणून देईल, या सगळ्यांचं तुम्हाला बिल देण्यात येईल. साहित्य मिळाल्यावर बिलाचे रक्कम अदा करावी लागेल. या आगळ्यावेगळ्या योजनेचं शहरातील नागरिकांनीही स्वागत केलं असून यामुळे संचारबंदीमध्ये नागरिकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. हेही वाचा - काय म्हणावं याला? जीव घालून ड्युटी करणाऱ्या पोलिसावर घातली गाडी! या संचारबंदी दरम्यान पोलीस आयुक्तांनी अमरावती शहराच्या सर्व सीमा सील केल्याअसून शहरात 45 ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके आहेत. अत्यावश्यक साहित्य किंवा औषधी किंवा दवाखाना यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसानी माणुसकीची वागणूक द्यावे, असे आदेश देण्यात आले आहे. मात्र, विनाकारण फिरणाऱ्या ना मात्र फटके बसणार आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी आखलेली योजना यशस्वी झाल्यास शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या