गुजरातकडे निघाले होते चालत, भरधाव ट्रकने 4 जणांना चिरडले

गुजरातकडे निघाले होते चालत, भरधाव ट्रकने 4 जणांना चिरडले

संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आलं होतं.

  • Share this:

विजय राऊत, प्रतिनिधी

विरार, 28 मार्च :  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन आहे.  सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे.  यात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण  गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. परत वसईच्या दिशेनं येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात  एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघे जण हे ट्रकच्या चाकाखाली सापडले गेले. त्यामुळे चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - हेच बाकी होतं! कोरोनाच्या भीतीनं पोलिसांनी दांडुके केले सॅनिटाइज, VIDEO VIRAL

या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पटलेल्या पैकी कल्पेश जोशी (32) तर दुसरा मयांक भट (34) अशी आहेत. तर इतर 3 जखमींना विरारच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर दुसरीकडे गुजरात आणि राजस्थान येथील मजूर आपल्या मूळगावी निघाले आहे. परंतु, गुजरात शासनाने आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व नागरिक सीमा भागात अडकून पडले आहेत. यामुळे विभागांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा -Coronavirus चा महाभयानक चेहरा, परिस्थितीनुसार बदलतो रूप

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन घोषित केल्याने मुंबई पुण्यासह पालघर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागात असलेल्या गुजरात आणि राजस्थान भागातील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाण्याची पसंत केले आहे. रेल्वे तसेच इतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडोंच्या संख्येनं असे नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते.

ही सर्व मंडळी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाड जवळ पोहोचली असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्यानं शेकडोच्या संख्येनं हे बांधव खोळंबून पडले आहेत. एकीकडे राज्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी असताना ही सर्व मंडळी एकत्रितपणे रस्त्यावर बसून राहिली असल्यामुळे सीमाभागावर तणाव निर्माण झाला आहे.

First published: March 28, 2020, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या